वाढते प्रदुषण व पाणी समस्याबाबत ग्रामपंचायत पास्थळ व ग्रामस्थ यांचा MPCB व MIDC पाणी पुरवठा विभाग कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा
वाढते प्रदुषण व पाणी समस्याबाबत ग्रामपंचायत पास्थळ व ग्रामस्थ यांचा MPCB व MIDC पाणी पुरवठा विभाग कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा
बोईसर : दिनांक 8 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत पास्थळ व ग्रामस्थ यांच्या मार्फत धडक आक्रोश मोर्चा वाढते प्रदुषण व ग्रामस्थाना पाणी न देता कंपन्याना देण्याच काम करतात तसेच विविध प्रमुख मांगण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, तारापुर व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, तारापुर पाणी पुरवठा विभाग यांच्या कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
तारापुर एमआयडीसी ही आशियातील सर्वात मोठी एमआयडीसी असुन येथे कंपनी बरोबर प्रदुषण ही जास्त प्रमाणात आहे आणि येथील कारखानदार प्रदुषण कमी करण्याचा प्रयन्त ही करत नाही त्यामुळे वाढत्या प्रदूषणाचा त्रास आजुबाजूला राहणाऱ्या गावातील लोकांना होत असुन त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अश्याच औद्योगिक क्षेत्राजवळील पास्थळ गावात गेली 25/30 वर्षापासून गावाच्या आजुबाजूस असणारे औद्योगिक कंपनीमुळे शेतकरी ग्रामस्थ देशोधडीला लागला आहे, तसेच नैसर्गीक भुगर्भातील पाणी रंगीत रसायन मिश्रित झालेले आहे गेल्या महिन्यापासून रसायन मिश्रित पाणी पास्थळ गावात सोडले जात असुन पास्थळ गावात औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याकडून जलप्रदुषण व वायुप्रदुषण प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तसेच मऔविमहामंडळ, पाणी पुरवठा - देखभाल, विभागामार्फत पास्थळ गावास होत असलेला पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरे प्रमाणात करण्यात येत आहे आणि महिन्यापासून रात्रीचे वेळेस पाणी पुरवठा बंद करून कंपनीला पाणी दिले जाते असा ही आरोप करण्यात आला आहे तसेच याबाबत संबधित विभागाला वारंवार लेखी तक्रार देऊन ही अजिबात दखल घेतली जात नसल्यामुळे पास्थळवासी खुप त्रस्त झाले आहेत त्याकरीता आता नाही तर कधीच नाही म्हणून धडक आक्रोश मोर्चा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, तारापुर आणि महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, तारापुर पाणी पुरवठा यांच्या कार्यालयावर काढण्याचा निर्णय ग्रामपंचायत पास्थळ व ग्रामस्थाकडून घेण्यात आला आहे.
Comments
Post a Comment