पालघर जिल्ह्यात पोलीसांचे "ऑपरेशन ऑल आउट "
पालघर जिल्ह्यात पोलिसांचे "ऑपरेशन ऑल आउट " "ऑपरेशन ऑल आउट" चा उद्देश्य -जिल्ह्यातील गुन्हेगारा वर कारवाई करणे व कायद्याचा वचक बसविणे. पालघर : पालघर जिल्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून दिनांक 27/07/2022 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 22.00 वाजे पर्यंत `ऑपरेशन ऑल आउट ´हे अभियान राबविण्यात आला. या अभियानात जिल्हा पोलीस अधीक्षकासह 50 पोलीस अधिकारी व 332 पोलीस अंमलदारानी सहभागी होऊन अभियान राबविले. सदर या अभियानात 1)रस्त्यावर नाकाबंदी 2)हंटर टीम -कारवाई पथक 3)कोम्बिग ऑपरेशन अश्या तीन टप्या मध्ये पार पाडण्यात आले.हे अभियान पालघर जिल्ह्यात अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात आले. या अभियानात गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने 16 पोलीस ठाणे हद्दी तील 34 महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती.तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगाराच्या आश्रयस्थान असलेल्या एकूण 23 वस्त्यामध्ये एकाच वेळी कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर अभियानात पोलीस अधीक्षक -1, अपर पोलीस अधीक्षक -1, उपविभागीय पोलीस...