पालघर जिल्ह्यात पोलीसांचे "ऑपरेशन ऑल आउट "

 पालघर जिल्ह्यात पोलिसांचे "ऑपरेशन ऑल आउट "

"ऑपरेशन ऑल आउट" चा उद्देश्य -जिल्ह्यातील गुन्हेगारा वर कारवाई करणे व कायद्याचा वचक बसविणे.

पालघर : पालघर जिल्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून दिनांक 27/07/2022 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 22.00 वाजे पर्यंत `ऑपरेशन ऑल आउट ´हे अभियान राबविण्यात आला. या अभियानात जिल्हा पोलीस अधीक्षकासह 50 पोलीस अधिकारी व 332 पोलीस अंमलदारानी सहभागी होऊन अभियान राबविले.

सदर या अभियानात 1)रस्त्यावर नाकाबंदी 2)हंटर टीम -कारवाई पथक 3)कोम्बिग ऑपरेशन अश्या तीन टप्या मध्ये पार पाडण्यात आले.हे अभियान पालघर जिल्ह्यात अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात आले.

या अभियानात गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने 16 पोलीस ठाणे हद्दी तील 34 महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती.तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगाराच्या आश्रयस्थान असलेल्या एकूण 23 वस्त्यामध्ये एकाच वेळी कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले.

 


  सदर अभियानात पोलीस अधीक्षक -1, अपर पोलीस अधीक्षक -1, उपविभागीय पोलीस अधिकारी -3,पोलीस निरीक्षक -8, सहा. पोलीस निरीक्षक -13, पोलीस उपनिरीक्षक -24,पोलीस अंमलदार -332  सहभागी झाले होते.

या अभियानात 125 हिस्ट्रीशिटरांना तपासले, तसेच गुन्हे उघड करुन त्यात गेलेला माल एकूण 2,09,000/-किमतीचे 4 मोटर सायकल ताब्यात घेण्यात आले,23 पाहिजे असलेले आरोपी अटक केले,मालमत्तेचे गुन्हे करणारे सराईत 33 आरोपीची तपासणी करण्यात आली,26 वॉरेन्ट व 114 समन्सची बजावणी केली, दारूबंदी कायद्यान्वये 30 गुन्हे दाखल करुन 1,72,635/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध जुगार प्रकरणी 2 गुन्हे दाखल करून 7,410/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, सी.आर.पी.सी कलम 110 मध्ये -3, कलम 109 मध्ये -37, कलम 107 मध्ये -89 कारवाई केल्या. मोटर वाहन कायदा 1988 प्रमाणे 254 वाहन धारकावर कारवाई करत 1,10,800/- रूपये कीमतीचा दंड वसूल केला, भा. द. वि कलम 283 प्रमाणे 24 केस व अंमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये 01 केस  अश्या प्रकारे कारवाई करण्यात आली आहे.

सदरचे ऑपरेशन हे श्री. बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, व श्री. प्रकाश गायकवाड अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी