सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडणार! राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर थेट जनतेतुन सरपंच व नगराध्यक्ष यांची निवड रद्द केली.परंतु आता नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेकडून निवडले जावेत अशी मांगणी भाजपाच्या नेत्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि सरपंच यांची निवड थेट जनतेमधून होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने याला स्थगिती देत पूर्वीची पद्धत पुन्हा लागु केली होती. यामध्ये निवडून आलेल्या सदस्यामधून नगराध्यक्ष व सरपंच निवडला जायचा मात्र आता नवे सरकार सत्तेत येताच हा नियम बदलण्याची शक्यता आहे. आता थेट सरपंच व नगराध्यक्षाची निवड ही जनतेमधून होउ शकते. मिळालेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ग्रामविकास व नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक घेऊन त्यात पुन्हा एकदा सरपंच व नगराध्यक्षाची निवड जनतेतुन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायतीचे अध्यक्ष, आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतुन निवडण्याची पद्धत लवकरच अस्तित्वांत येण्याची शक्यता आहे.

 सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडणार!


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर थेट जनतेतुन सरपंच व नगराध्यक्ष यांची निवड रद्द केली.परंतु आता नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेकडून निवडले जावेत अशी मांगणी भाजपाच्या नेत्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येत आहे.

आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि सरपंच यांची निवड थेट जनतेमधून होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने याला स्थगिती देत पूर्वीची पद्धत पुन्हा लागु केली होती.

यामध्ये निवडून आलेल्या सदस्यामधून नगराध्यक्ष व सरपंच निवडला जायचा मात्र आता नवे सरकार सत्तेत येताच हा नियम बदलण्याची शक्यता आहे. आता थेट सरपंच व नगराध्यक्षाची निवड ही जनतेमधून होउ शकते.

    मिळालेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ग्रामविकास व नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक घेऊन त्यात पुन्हा एकदा सरपंच व नगराध्यक्षाची निवड जनतेतुन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायतीचे अध्यक्ष, आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतुन निवडण्याची पद्धत लवकरच अस्तित्वांत येण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी