किसान मोल्डिंग कंपनी चे कामगार बेमुदत संपावर
किसान मोल्डिंग कंपनी चे कामगार बेमुदत संपावर
क्राइम अलर्ट
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील कायमवस्वरुपी व कंत्राटी कामगारांचे सातत्याने शोषण होत असते. भरपूर कंपन्यामध्ये किमान वेतन ही अनेक कामगाराना मिळत नाही. व जे मिळते ते वेळेवर मिळत नाही तसेच प्रा. फंड, ई.एस. आय.सी,बोनस व रजांचे फायदे आणि किमान वेतनात वाढ नाही, वाढल्या किमान गरजा भागवण्यासाठी पूरेसे वेतन मिळावे यासाठी कामगाराना संपावर जावे लागते हे दुर्दव आहे.
अशीच घटना पालघर जिल्यातील बोईसर येथील किसान मोल्डिंग कारखान्यातील 356 कामगारांनवर होण्याऱ्या शोषणामुळे कामगार बेमुदत संपावर गेलेले आहे.
किसान मोल्डिंग ही देशातील नामचित कारखाना असून या कंपनीचा व्यवहार ही मोठा आहे. परंतु कामगारांच्या किमान वेतना बरोबर कोणत्याही प्रकारची सुविधा कंपनी कडून पुरवली जात नसल्याचे समजले आहे.
या कंपनीत 206 कायमस्वरूपी आणि 150 कत्राटी कामगार असून यात बरेच कामगार हे 20 ते 25 वर्षापासून या कंपनीत काम करीत आहेत. परंतु कंपनी कडून बहुतेक कामगाराना प्रॉव्हीडंट फंट, ई एस आय सी, आरोग्य विमा यात त्यांची नोदणीकरण नाही. व त्यांना किमान वेजेस व सुट्ट्या नाही यामुळेच कंपनीच्या मनमर्जी नुसार, व दादागिरीमुळे कामगारांचे शोषण केले जाते.
त्यामुळे कंपनी च्या शोषणामुळे 16 जूलै 2022 पासून 356 कामगार हे बेमुदत संपावर गेलेले आहेत.
Comments
Post a Comment