केमिकल पाण्यामुळे पाम खाडीतील अनेक मासे बाधीत!
केमिकल पाण्यामुळे पाम खाडीतील अनेक मासे बाधीत!
क्राइम अलर्ट
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखाने आजही छुप्या पद्धतीने केमिकल मिश्रित दुषित पाणी नैसर्गिक नाल्यात सोडण्यात माहिर असून त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर तसेच नैसर्गिक जलचर प्राण्यांवर देखील पडत आहे.
आज रोजी औद्योगिक वसाहती लगत असलेल्या मौजे पाम गावातील खाडीमध्ये केमिकल मिश्रित पाणी मिसळल्यामुळे अनेक मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे गावातील ग्रामस्थांमधून असंतोष निर्माण झाला आहे.
प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून प्रदुषित कारखान्यांवर ठोस कारवाई करण्यात येत नसून प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी धरून कारखाना मालक उत्पादनाची परवानगी नसताना उत्पादन घेत असून त्याचा अतिरिक्त केमिकल मिश्रित पाणी किंवा घातक घनकचरा अवैध पद्धतीने विल्हेवाट लावले जात आहे.
Comments
Post a Comment