लाचखोर तहसीलदार व मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात,1.50 लाखाची लाच घेताना मंडळ आधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

 लाचखोर तहसीलदार व मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात,1.50 लाखाची लाच घेताना मंडळ आधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.


 पालघर :तहसिल कार्यालय, वसई येथील लोकसेवक प्रदीप दामोदर मुकणे (वय 53) पद -नायब तहसिलदार, वर्ग -2, यांना लाचेची मांगणी केल्याने व लोकसेवक संजय राजाराम सोनावणे (वय 53) पद-मंडळ अधिकारी, माणिकपुर, वर्ग-3 यांना लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,ठाणे पथकाने ताब्यात घेतले आहे.

दिनांक 20 जून 2022 रोजी तक्रारदार यांचे मालक यांनी विकत घेतलेली जमीन गांव मौजे. गोखिवरे -सर्वे नं.233, हिस्सा नं अ /3 क्षेत्र 1.20.0हे आर या जमीनीचे फेरफार क्र.4372 रद्द करणेकामी तक्रारदार यांच्या कडून 2,00,000/- रूपये लाचेच्या रकमेची मांगणी केली असल्याबाबत लेखी तक्रार दिली होती.

  त्या अनुषगाने दिनांक 22 जून 2022 रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये लोकसेवक संजय सोनावणे यांनी तक्रारदार यांच्याकड़े प्रलबित कामाची पुर्तता करुन देण्यासाठी 2,00,000/- रु लाचेच्या रकमेची मांगणी करुन तड़जोडी अंती 1,90,000/-मांगणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पड़ताळणी अंती निष्पन्न झाले.

त्यानंतर दिनांक 30जून 2022 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई मध्ये लोकसेवक प्रदीप मुकणे नायब तहसीलदार यांनी तक्रारदार यांचे प्रलबित कामाची पुर्तता करुन देण्यासाठी 2,00,000/-रु लाचेच्या रकमेची मांगणी करुन तडजोडी अंती 1,50,000/-रु मांगणी करुन स्वीकारल्याचे मान्य केल्याचे पडताळणी अंती निष्पन्न झाले.

त्या अनुषगाने दिनांक 4 जुलै 2022 रोजी सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक संजय सोनावणे, मंडळ अधिकारी, माणिकपुर यांनी तक्रारदार यांचे कडून 1,50,000/- रु स्वीकारल्याने त्यांना 15.00 वा रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच लोकसेवक प्रदीप मुकणे, नायब तहसीलदार, वसई यांना तक्रारदार यांचेकडे लाचेची मांगणी केल्याने त्यांना 16.20 वा ताब्यात घेण्यात आले आहे. व त्यांच्यावर भ्रष्टाचार 

प्रतिबंध अधिनियम सन 1988 (संशोधन 2018) चे कलम 7 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. श्री. डॉ. पंजाबराव उगले, सो पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. ठाणे परिक्षेत्र ठाणे, यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी