बोईसर शहरात अवधनगर येथे शासकीय जागेवर अतिक्रमण
बोईसर शहरात अवधनगर येथे शासकीय जागेवर अतिक्रमण
मुरली गुप्ता, अमोल बोरे,सोनू हदयनाथ पांडे यांना सरावली ग्रामपंचायत च्या नोटिसा
बोईसर : बोईसर शहरात वाढत्या लोकसंख़्ये मुळे काही लोकांनी पैसा कमविण्यासाठी आता शासकीय जागेवर अतिक्रमण करुन त्यावर गोडावुन व ईमारत बांधण्याच काम चालू केल आहे.
बोईसर शहरातील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथे बहुतांश जागा ही शासकीय असून त्यावर बहुतेक लोकांनी अतिक्रमण करून गोडावून व ईमारत बांधले आहेत.
अश्या मध्येच सध्या अवधनगर येथे चालू असलेल्या मुरली गुप्ता, अमोल बोरे व सोनू ह्दयनाथ पांडे यांच्या वर अनधिकृतपणे बांधलेल्या गोडावुन व ईमारत बांधकाम दूर करण्याबाबत नोटिसा काढल्या आहेत.
सरावली स. न 55(ब) प्लॉट नंबर 45 यात अमोल बोरे व मुरली गुप्ता यांनी बिनशेती जागेत जिल्हा नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी न घेताच विनापरवाना गोडावुनच्या बांधकामाला सुरवात केली आहे.तरीही परवाना नसताना बांधकाम केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे नोटिस देण्यात आली आहे.
असेच सरावली ग्रामपंचायत क्षेत्रातील अवधनगर येथील सिफा मेडिकल गल्ली येथील शासकीय जागेत सोनू पांडे ह्यानी अनधिकृतपणे रहीवाशी इमारतिच्या बांधकामाला सुरवात केली आहे तरीही शासकीय जागेत बांधलेली अनधिकृत ईमारत दूर करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली आहे.
तरीही अश्या अनधिकृत बांधकाम करण्याऱ्यावर व शासकीय जागेवर अतिक्रमण करून ईमारत बांधण्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावे असा लोकांन मध्ये चर्चे चा विषय बनला आहे.
Comments
Post a Comment