प्रदुषित पाणी नैसर्गिक नाल्यात सोडणाऱ्या इरा क्लोथिंग कारखाना केला ताळेबंद!

 प्रदुषित पाणी नैसर्गिक नाल्यात सोडणाऱ्या इरा क्लोथिंग कारखाना केला ताळेबंद!

क्राइम अलर्ट : स्वप्निल पिंपळे 


बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील काही प्रदुषित कारखान्यांमुळे आज प्रदुषणाचा वाढता उच्चांक पाहता मानवी जीवना करिता पर्यावरण एक छाप बनतं चालला आहे का असा प्रश्न जनतेच्या मनातून उपस्थित केला जात आहे 

   कंपन्या मधून निघणारे घातक केमिकल युक्त पाणी नैसर्गीक नाल्यात सोडून देण्याचे काम काही कंपन्या करत आहे.असे केमिकल युक्त पाणी बाहेर सोडून पर्यावरणाला हानि पोहचू नये यासाठी कंपनीत सांडपाणी प्रक्रिया सयंत्र (ETP) बसवण्यात येते. परंतु काही कंपनी पैसे वाचवण्यासाठी शार्टकट मार्गाचा अवलंब करत दुषित पाणी नैसर्गिक नाल्यात सोडताना दिसत आहे.


अश्याच ईरा क्लोथिंग प्रा. लि-प्लॉट.नं -बी. 7/3 ही कंपनी कपड़ा कंपनी असून ह्या कंपनीने सांडपाणी प्रक्रिया सयंत्र (ETP) चा वापर न करता केमिकल युक्त पाणी थेट नैसर्गीक नाल्यात व एम. आय. डी. सी च्या जुन्या चेंम्बर लाईन मध्ये सोडून देण्याच काम करत असत सदर कंपनी पर्यावरणा च्या सर्व नियमाचे उल्लंघन करून चालवत असताना दिसुन आले आहे.या कंपनीला अश्या चुकीच्या पद्धतीने काम करत असल्या कारणाने दिनांक 15/06/2022 रोजी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळा तर्फे नोटिस ही बजावण्यात आली होती. परंतु  कंपनीने कोणत्याही नियमाचा पालन न करता कंपनी चालू ठेऊन केमिकल युक्त पाणी बाहेर सोडण्याच काम चालू ठेवल.

  या अनुषंगाने सदर उद्योगावर  कारवाई करत  दिनांक 29/06/2022 रोजी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, ठाणे प्रादेशिक अधिकारी  यांनी क्लोजर डायरेक्शन देत उद्योगाला ताळेबंद केले आहे

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी