देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखे कडून करण्यात आले जेरबंद
देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखे कडून करण्यात आले जेरबंद
गुन्हा घडण्याच्या पहलेच गुन्हेगाराना पकण्यात पोलिसाना यश
दिनांक 29 जून 2022 रोजी श्री.अजय वसावे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना गोपनीय माहिती मिळाली कि पालघर पश्चिम येथे देशी बनावटीची पिस्टल ची विक्री होणार आहे. अशी माहिती मिळताच श्री. अजय वसावे पालघर यांनी पथक पालघर पश्चिमेस रवाना केले. सदर पथकाने संशयित आरोपीत इसम यांना पकडून अंगझड़ती घेतली असता त्यात आरोपी क्र 1(वय 35)रा. तारकपुर नगर, अहमदनगर, याच्याजवळ देशी बनावटीची पिस्टल व 6 जिवंत काडतुस असे कोणताही शासकीय परवाना नसताना कोणता तरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने जवळ बाळगले व आरोपी क्र.2(वय 40) रा. पुणे, रा हरेगाव, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर यास सदरचा गुन्हा करण्यास सहाय्य केले म्हणून दोन आरोपीत अटक करण्यात आले आहे.
सदर आरोपीन कडून एक पिस्टल,6 जिवंत काडतुस व दोन मोबाईल असे 27,100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.192/2022 भारतीय शस्त्र अधिनियम 1959चे कलम 3,25(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा अधिक तपास पो. उप. निरीक्षक एस. एन. उबाळे पालघर पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अजय वसावे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पो उप. निरी सागर पाटील, सहा फ़ौज /राजेश वाघ, पोहवा /मुदतसर दांडेकर,हीरामण खोटरे, कपिल नेमाडे, पोना /हेमंत भागरे, मनोज राउत, पोशि /हेमंत झिने सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment