गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बधमुक्त: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बधमुक्त: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
क्राइम अलर्ट :
राज्यातील गणेशभक्त आणि गोविंदा पथकासाठी आंनदाची बातमी आहे.कोरोना व्हायरस महामारी काळात सण, उत्सवांवर घालण्यात आलेल्या मर्यादा, निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यमान सरकारने घेतला आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्व सण - उत्सवावर निर्बंध तसेच उत्सवावर मर्यादा होत्या परंतु या वर्षी सर्व मंडळाचा उत्साह आणि गेले दोन वर्षाची मर्यादा लक्षात घेऊन उत्सवावर घालण्यात आलेल्या मर्यादा,निर्बंध हटविण्यात आले आहे.
राज्यात नवे सरकार आल्यापासून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई तील सर्व गणेशोत्सव पदाधिकाऱ्याची व संघटनाची बैठक झाली व त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
* यात गणेशोत्सव काळात बसवल्या जाणाऱ्या गणपती मूर्तिसाठी उंचीचे कोणतेही निर्बध असणार नाहीत. त्यामुळे मंडळाना हव्या तेवढ्या ऊंचीच्या मूर्ति नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून बसवता येणार आहेत. याशिवाय गणपतीचे आगमन होणाऱ्या सर्व रस्त्यावरील खड्डेही बुजविण्यात येतील. तसेच गणेश नोदणीसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार आहे.
* कोकणात जाणाऱ्या आणि राज्यातील गणेश भक्ताना प्रवासासाठी अधिकच्या बसेस सोडण्याबाबत व टोल माफ करण्यात आला आहे. व गणपती उत्सवानिमित्त प्रवासांची गैरसोय होउ नये म्हणुन एकूण 214 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत.
* सणाच्या काळात ज्या लोकांवर यासबंधीत छोटे मोठे गुन्हे दाखल झाले होते. ध्वनिप्रदुषणासबंधी ज्याच्यावर गुन्हे नोदवण्यात आले होते. त्यासबंधीत अभ्यास करुन शक्यते गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे.
मात्र गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करताना काही नियमांच पालन देखील कराव लागणार असून लवकरच नवी नियमावली जाहीर केली जाईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.त्यामुळे यंदा दहीहंडी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरी करता येणार हे निश्चित झाले आहे.
Comments
Post a Comment