मोटर सायकल चोर जेरबंद

 मोटर सायकल चोर जेरबंद

मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश 

पालघर :मोटर सायकलची चोरी करुन विक्री करणाऱ्या एक संशयीत इसम वय वर्ष 31,रा -लोणीपाडा कुंकुवाडी, रूम नं -04, शाहनवाज चाळ, ता -डहाणु, जि -पालघर याला ताब्यात घेण्यात आले आहे.

    डहाणु पोलीस ठाणे हद्दीत माहे जून व जूलै 2022 मध्ये डहाणु पूर्व भागातील रस्त्याचे कडेला पार्क केलेल्या मोटर सायकली चोरुन नेण्याचे प्रमाण वाढत होते. त्या संदर्भात गेले दोन महिण्यात डहाणु पोलीस ठाणे येथे मोटर सायकल चोरीचे एकूण अलग अलग 07 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

    डहाणु पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरीचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील,पोलीस अधीक्षक,पालघर श्री.प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, अतिरिक्त कार्यभार डहाणु विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पोलीस तपास पथके तयार करुन अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मोटार सायकलीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याबाबत आदेश देण्यात आले.

सदर पथकापैकी सपोनि /व्ही. एस. नार्वेकर यांना गोपनीय सुत्राकडून माहिती मिळाली की,डहाणु पोलीस ठाणे हद्दीतील एक इसम काही कामधंदा न करता मोटार सायकल चोरी करुन कमी किमतीत मोटार सायकल ची विक्री करतो अशी माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषगाने एक संशयीत इसम ला ताब्यात घेण्यात आले.सदर इसमाची कसून चौकशी केली असता संशयीत इसम हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले व आरोपीने डहाणु रेल्वे पूर्व या परिसरातुन 07 मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल केलेले आहे.

    सदर आरोपी यांच्या ताब्यातून एकूण 2,23,000/-रूपये कीमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुनहयाचा पुढील तपास सपोनि /व्ही. एस. नार्वेकर, डहाणु पोलीस ठाणे हे करीत आहेत.

   सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील,पोलीस अधीक्षक,पालघर श्री.प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग,अतिरिक्त कार्यभार डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नामदेव बंडगर, प्रभारी अधिकारी डहाणु पोलीस ठाणे, सपोनि /व्ही. एस.नार्वेकर,  /सुनील नलावडे, पोहवा /563-चौधरी,668-रासम,623-खांडवी, पोना /491-कहार,957-भरसट, पोशि - कदम, थाळेकर सर्व नेमणुक डहाणु पोलीस ठाणे यांनी यशस्विरित्या पार पाडली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी