प्लास्टिक बंदी विरोधात पालघर नगर परिषद 'अक्शन मोडवर
प्लास्टिक बंदी विरोधात पालघर नगर परिषद 'अक्शन मोडवर
पालघर :पालघर नगर परिषद यांनी प्लास्टिक बंदी नियमाची अमंलबजवाणी करण्याचे आदेश दिले आहे.
यामध्ये किराणा स्टोर्स, मच्छी विक्रेते, मटन- चिकन विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, इलेक्ट्रीक विक्रेते, फळ विक्रेते, कपड़ा व्यापारी, हातगाडी व्यावसायिक, हार्डवेअर विक्रेते व पालघर शहरातील इतर सर्व विक्रेते /व्यापारी यांना प्लास्टिक बंदी चे आदेश देण्यात आले आहे.
सदर प्लास्टिक बंदी केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासन नियम व अधिसुचना नुसार पालघर नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिकांना सिंगल यूज़ प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक पासून बनवलेल्या अश्या वस्तु ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो त्यांनंतर त्यांना फेकून दिले जाते अश्या वस्तुना प्रतिबंधित करण्याकरीता 30 सप्टे 2021 पासून 75 मायक्रॉनपेशा कमी जाड़ीच्या आणि 31 डिसे 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
या अनुषगाने प्लास्टिक बंदी बाबत उल्लघंन झाल्यास पहिला गुन्हा -5000/- रु, दूसरा गुन्हा -10,000/- रु व तीसरा गुन्हा 25000/- +3 महीने कारवास अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Comments
Post a Comment