हरवलेल्या मुलाला अवघ्या काही तासात शोध: तारापुर पोलीसांची उत्तम कामगिरी
हरवलेल्या मुलाला अवघ्या काही तासात शोध: तारापुर पोलीसांची उत्तम कामगिरी
तारापुर : तारापुर पोलीस स्टेशन हद्दीतील पास्थल गावातील आत्मशक्तिनगर येथे राहणारा श्रेयश प्रमोद शिवदास (वय 5 वर्ष) या हरवलेल्या मुलाला तारापुर पोलीसानी अवघ्या काही तासातच शोधून काढण्यात यश आल आहे.
काल दिनांक 7 जूलै 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता श्रेयश खेळण्यासाठी बाहेर गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी मुलगा घरी परतला नाही. म्हणून घरच्यानी परिसरात शोध घेतला मुलगा घराबाहेर एकटाच गेल्याने आणि परिसरात सापडत नसल्याने घरचे घाबरले. त्यांनी तात्काळ पाचमार्ग पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. आणि श्रेयश हरवल्याची माहिती दिली.
पोलीसानी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तारापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव व त्यांच्या टीम ने परिसरात शोधशोध सुरु केली. त्या दरम्यान पोलीसानी श्रेयश चा फोटो आणि संपर्क क्रमांक व्हाट्सअप्प ग्रुप वर शेअर केला. काही तासातच शोधाशोध दरम्यान एका व्यक्तिने व्हाट्सअप्प ग्रुपवर फोटो बघून श्रेयशला पोलिसाच्या ताब्यात दिले. आणि पोलीसानी श्रेयश च्या पालकांशी संपर्क करुन श्रेयश ला सुखरूप पणे सुपुर्द केले.
Comments
Post a Comment