अनोळखी इसमाचा रेल्वे गाडीखाली सापडून मृत्यु
अनोळखी इसमाचा रेल्वे गाडीखाली सापडून मृत्यु
क्राइम अलर्ट
पालघर : पालघर रेल्वे स्टेशन ते उमरोली रेल्वे स्टेशन कि.मी.नं 96/08 च्या जवळ डाउन ट्रकवर अंदाजे 35 वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वे गाडीखाली सापडून मृत्यु झाल्याची घटना 17 जुलै 2022 रोजी 20.10 वाजता रेल्वे लाईनवर घडली.
प्राप्त माहितीनुसार सदर अनोळखी इसमाचा कोणत्या तरी अज्ञात गाडीखाली सापडून मुंडके वेगळे होऊन शरीराचा चेंदा मेंदा होऊन मयत अवस्थेत मिळून आला आहे असे स्टेशन मास्टर पालघर यांनी कळविले. सदर मयताच्या उजव्या हाताचे मनगटावर हनुमानाचे चित्र गोंदलेले असून उंची - 5.5, अंगाने -मध्यम, रंगाने - सावळा, चेहरा -गोल, अंगात पाढऱ्या रंगाचा शर्ट, नेसणीस काळ्या रंगाची फूल पैंट या वर्णनाचा अनोळखी इसमाचा रेल्वे गाडीखाली सापडून मृत्यु झाले आहे.
सदर प्रकरणी ADR NO. 60/2022- 174 सी आर पी सी नुसार अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. तरीही सदर मयताचे कोणी वारस मिळून आल्यास पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे नंबर 02267649716 यावर संपर्क साधावे. व पुढील तपास पालघर रेल्वे पोलीस ठाणे करीत आहे.
Comments
Post a Comment