भू माफिया अभिनय चौधरी, दिगंबर शिवदे कडून धनानीची जमीन हडपण्याचा प्रयत्न
भू माफिया अभिनय चौधरी, दिगंबर शिवदे कडून धनानीची जमीन हडपण्याचा प्रयत्न
तारापूर पोलिसांच्या सावध पवित्र्यामुळे घटनास्थळी टळला मोठा अनर्थ
क्राईम अलर्ट: स्वप्निल पिंपळे
तारापूर: पोलिस ठाणे हद्दीत पास्थळ स.नं- ११/७, ३९/१ इ, ५१, ५२, ५५/६ ड एकूण क्षेत्र १२.७८ हेक्टर भूखंड दिनांक ३०/११/१९९७ मो.र.नं-१०८/९६ पालघर मोजणी विभागाकडून मोजणी करत जहांगीर रतनलाल कुपर, केकी नरिमन कुपर यांच्याकडून इकबाल हाजीअली धनानी, आसिफ इकबाल धनानी, जुबेर इकबाल धनानी व इतर यांनी १९९७ साली खरेदी केलेल्या जमीनीचे दस्त क्रमांक ०१७३४/२००९ दुय्यम निबंधक पालघर येथे केलेल असून सदर जमीन बाबत काही प्रलंबित बाबी न्यायप्रविष्ट असल्याचे दिसून येत आहे.
धनानी कुटुंब पालघर येथे रहात असून सदर भूखंडावर गेल्या २६ वर्षांपासून जमीनीची देखभालीसाठी एक परिवार रहात असून तेथे देखभाल करण्याचे काम ते करत आहेत.
धनानी परिवाराकडून सदर भूखंडावर सातत्याने ये जा नसल्याचे त्याचा फायदा घेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अभिनय चौधरी व दिगंबर शिवदे या भू माफियाकडून धनानी याच्या जागेत घुसखोरी करत जमीन हडपण्याचा प्रयत्न सातत्याने होत होता परंतु धनानी परिवाराकडून तो पर्यंत हाणून पाडत असताना चौधरी परिवाराकडून सतत हस्तक्षेप होत होता. सदर प्रकरणी धनानी परिवाराकडून तारापूर पोलिसांकडून मदत मांगण्यात आली त्या वेळी तारापूर पोलिसांकडून शांततेचा भंग होऊ म्हणून दोन्ही बाजूंच्या लोकांना समजवत प्रकरण शांततेत हाताळण्यासाठी सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा भू माफियाकडून धनानी परिवाराच्या जमीनीवर अतिक्रमण होत असल्याचे देखभालीसाठी असलेल्या व्यक्तीने जुबेर इकबाल धनानी यांना फोन करून सांगितले नंतर धनानी कुटुंब व भू माफिया अभिनय चौधरी व त्याचे कुटुंबीयात जोरदार वादावादी झाल्यानंतर चौधरी कुटुंबाकडून ११२ क्रमांकावर फोन करत स्थानिक पोलिसांना बोलविण्यात आले.
घटनास्थळी पोहोचले तारापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव व त्यांचा टीमकडून सावरासावर करत कुठलेही अनुचित प्रकार होण्यास रोखण्यात आले तसेच दोन्ही बाजूंच्या लोकांना समज पत्र देण्यात आले.
दरम्यान एकाच जागेचे अनेक बोगस ७/१२ तयार करून भू माफिया अभिनय चौधरी,दिगंबर शिवदे व त्यांच्या भागिदारांकडून मोकळ्या जागेवर कब्जा करून मुळ मालकांकडून लाखो रूपयांची मागणी करण्याचा व्यवसाय सुरू असून त्याकरिता काही माध्यमातून कुठल्याही प्रकारची सहा निशा न करता दुजोरा दिला जात आहे.
Comments
Post a Comment