पालघर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त `हर घर तिरंगा ´उपक्रम राबविणार

 पालघर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त `हर घर तिरंगा ´उपक्रम राबविणार 

*हर घर तिरंगा” उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी*

क्राइम अलर्ट :


पालघर  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “हर घर  तिरंगा” उपक्रमाला लोकसहभागाच्या व्यापक चळवळीचा एक भाग म्हणून नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी  ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले

        भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर , जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात , स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक,स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे , स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी , या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी " आजादी का अमृत महोत्सव " अर्थात " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव " अंतर्गत दि. १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये " हर घर झंडा " हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

         जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद व आत्मिक समाधान घेता यावे यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या लिंकच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले.

         जिल्हा प्रशासनाने लिंक तयार केली असून . सदर लिंक पुढील प्रमाणे आहे. https://palghar.gov.in/en/har_ghar_tiranga/  

या लिंकच्या माध्यमातून नागरिकांनी आपले नाव नोंदणी करावी.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी