डहाणुत भीषण अपघात : दोन जण जागीच ठार
डहाणुत भीषण अपघात : दोन जण जागीच ठार
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणु शहरात शनिवारी एका भरधाव कारने दोन जणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार भरत राउत ( वय 55) आणि व्यंकैश झोपे ( वय 38) अश्या दोन जणाचा कारच्या धड़केने मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्हीही डहाणु नगरपरिषदेत गटार साफसफाईचे काम करत होते.
काल संध्याकाळी मुसळदार पाऊस पडत असताना दोघेही रस्त्याच्या बाजूला एका भिंतीजवळ उभे होते.अचानक वेगाने आलेल्या कारने दोंघाना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला. ज्या कारने धडक दिली ती कार एक 16 वर्षाचा मुलगा चालवत होता. सदर धड़केत त्या मुलाला काहीही दुखापत झाली नसल्याचे समजले आहे.
या प्रकरणी डहाणु पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध कलम 304 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास चालू आहे.
Comments
Post a Comment