Posts

Showing posts from June, 2025

गिरगाव आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची वस्तीगृहात आत्महत्या; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Image
गिरगाव आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची वस्तीगृहात आत्महत्या; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पालघर   : डहाणू तालुक्यातील गिरगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, नववीत शिक्षण घेत असलेल्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीने वस्तीगृहात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. पल्लवी खोटरे हिने वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी रॉडला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थिनीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक ग्रामस्थ व पालक वर्गामध्ये या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून, वस्तीगृहांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेचा तपास सुरू असून विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांच...

खावडा ट्रान्समिशन प्रकल्पग्रस्तांना पारदर्शक भरपाई; शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Image
खावडा ट्रान्समिशन प्रकल्पग्रस्तांना पारदर्शक भरपाई; शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद पालघर : खावडा ट्रान्समिशन प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकतीच पीक भरपाई देण्यात आली असून ही भरपाई डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात वितरित करण्यात आली. संपूर्ण वितरण प्रक्रिया पारदर्शक, वेळेवर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. गुजरात राज्यातून महाराष्ट्रासाठी उभारण्यात येणाऱ्या उच्च दाब वीजवाहिन्यांच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ट्रान्समिशन टॉवर्स उभारले गेले. या कामामुळे अनेक शेतजमिनी प्रभावित झाल्या. परिणामी, संबंधित शेतकऱ्यांना योग्य पीक भरपाई देण्याची गरज ओळखून, ऊर्जामंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक प्रशासन व कृषी विभागाच्या समन्वयाने ही प्रक्रिया हाती घेण्यात आली. शेतीचा प्रकार, उत्पादनाचा हंगामी कालावधी, शेतीपद्धती आणि जमिनीचे शेतीमूल्य या घटकांचा विचार करून भरपाईचे दर ठरवण्यात आले होते. या आधीच जाहीर करण्यात आलेल्या दरांवर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. शेतकऱ्यांनी मो...

बोईसरमध्ये खड्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश

Image
बोईसरमध्ये खड्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश बोईसर – बोईसरमधील गणेशनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांपैकी तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेशनगर झोपडपट्टीत राहणारी चार अल्पवयीन मुले दुपारी सुमारास घराशेजारी असलेल्या मोकळ्या व खाजगी जागेतील खड्ड्यात पोहण्यासाठी गेली होती. खड्ड्यात पाणी साचलेले असून अंदाजे एक ते दीड वाजेदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पोहताना तीन मुले खोल पाण्यात बुडाली, तर एका मुलाला बाहेर पडण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस व तारापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य हाती घेत तीन मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मृतदेह पुढील तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व शोक व्यक्त होत असून संबंधित खड्डा खुला का ठेवण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्...

पालघर पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली

Image
पालघर पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली  पालघर – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस दलातर्फे जिल्हाभरात व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक  यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने ही मोहिम प्रभावीपणे पार पडली. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, व्यसनमुक्ती केंद्रे आणि विविध सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी जनजागृती सत्रे आयोजित करण्यात आली. शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी रॅली काढून “नशा मुक्त समाज” या उद्देशाने घोषणा देत लोकांमध्ये सजगता निर्माण केली. या अभियानादरम्यान बस स्थानक, रेल्वे स्टेशन, झोपडपट्ट्या, मोहल्ले, बाजारपेठा तसेच औद्योगिक भागामध्ये बॅनर, फलक, पोस्टर आणि होर्डिंग्ज लावू...

वाढवण बंदराच्या विरोधात समुद्रात जलसमाधी आंदोलन; स्थानिकांचा संतप्त विरोध

Image
वाढवण बंदराच्या विरोधात समुद्रात जलसमाधी आंदोलन; स्थानिकांचा संतप्त विरोध पालघर  – वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांचा आक्रोश अधिक तीव्र होत असून आज त्यांनी थेट समुद्रात उतरून ‘जलसमाधी आंदोलन’ केलं. जेएनपीटी कडून सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेला विरोध करत नागरिकांनी वाढवण समुद्रकिनारी घोषणाबाजी करत समुद्रात उतरून आंदोलन छेडलं. बंदर उभारणीच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या लाटांचे निरीक्षण करण्यासाठी जेएनपीटीकडून एका खासगी संस्थेला ड्रोन सर्व्हेचं काम दिलं आहे. हे सर्वेक्षण पोलिस बंदोबस्तात सुरू असतानाच स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी समुद्रात उतरून तीव्र विरोध नोंदवला. आंदोलकांनी सांगितले की, “हा बंदर प्रकल्प आमचं समुद्रावरचं हक्काचं जीवन हिरावून घेणार आहे. मच्छीमारांची उपजीविका संपवणारा हा प्रकल्प कदापि मान्य नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण बंदर होऊ देणार नाही.” या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते, मात्र आंदोलकांचा निर्धार कायम आहे.

बोईसरमध्ये डिजिटल वीज मीटर बसवण्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध — ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर

Image
बोईसरमध्ये डिजिटल वीज मीटर बसवण्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध — ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात वीज वितरण कंपनीकडून नागरिकांच्या संमतीशिवाय डिजिटल वीज मीटर बसवण्याच्या प्रकाराला ग्रामस्थांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोईसर ग्रामपंचायतीच्या दि. ११ जून रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करत वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला. सरपंच नीलम संखे   यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागरिकांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या. त्यांनी स्पष्ट सांगितले की, पालघर हा आदिवासी आणि डोंगरी भाग असून, अनेक गावांमध्ये अद्यापही मोबाईल नेटवर्क आणि स्मार्टफोनची सुविधा मर्यादित आहे. अशा परिस्थितीत डिजिटल मीटरसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक अटी पूर्ण करणे सामान्य जनतेला शक्य नाही. यावेळी ग्रामस्थांनी आरोप केला की, वीज कायदा २००३ च्या कलम ४७(५) नुसार ग्राहकांना मीटर निवडण्याचा हक्क असूनही, त्यांना विश्वासात न घेता अनेक ठिकाणी जुन्या मीटरऐवजी नव्या डिजिटल मीटरची जबरदस्तीने बसवणी केली जात आहे. काही प्रकरणांमध्ये तर ग्...

पालघर जिल्हा पोलीस दलात 'Measurement Collection Unit (MCU)' चे उद्घाटन

Image
पालघर जिल्हा पोलीस दलात 'Measurement Collection Unit (MCU)' चे उद्घाटन   पालघर : पालघर जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात आज एक नवा अध्याय जोडला गेला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘Measurement Collection Unit (MCU)’ या अत्याधुनिक यंत्रणेचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय दराडे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख , पोलीस उप अधीक्षक (गृह) श्रीमती संगीता शिंदे-अल्फोन्सो , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक  प्रदीप पाटील व अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. देशभरातील गुन्हेगारी तपास अधिक वेगवान व अचूक करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने लागू केलेल्या Criminal Procedure (Identification) Act, 2022 अंतर्गत NCRB, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये MCU यंत्रणा सुरू केली जात आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून अटक आरोपींच्या जैविक आणि भौतिक माहितीसह त्याचे रेटीना स्कॅन, हातापायांचे ठसे, शरीरावरील व्रण-खुणा, शरीराचे मोजमाप, सर्व बाजूंनी काढलेले फोटो व इतर वैयक्तिक माहिती संकलित केली जाते. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात संब...

तलासरीत मोठी कारवाई : १३.२४ लाखांचा अवैध दारू साठा पकडला, आरोपी अटकेत

Image
तलासरीत मोठी कारवाई : १३.२४ लाखांचा अवैध दारू साठा पकडला, आरोपी अटकेत तलासरी – तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील उधवा नवापाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १३ लाख २४ हजार रुपये किंमतीचा अवैध दारू साठा जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवार, दिनांक २४ जून २०२५ रोजी रात्री करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचे नाव रत्नेश लालजी उपाध्याय , व्यवसाय चालक,धानिव पेल्हार, ता. वसई, जि. पालघर) असे आहे. आरोपी रत्नेश उपाध्याय याने आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH 48 CQ 1981) या वाहनात दादरा नगर हवेली येथून आणलेला दारू साठा विनापरवाना भरून गुजरात राज्यात नेण्यासाठी तलासरी मार्गे वाहतूक करत होता. पोलिसांनी उधवा नवापाडा परिसरात सापळा लावून वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर देशी दारू आढळून आली. या दारू साठ्याची एकूण अंदाजे किंमत ₹13,24,000/- इतकी असून, वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पालघर जिल...

एक हात मदतीचा विद्यार्थ्यांसाठी!" — अग्निरा फाउंडेशन व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

Image
" एक हात मदतीचा विद्यार्थ्यांसाठी!" — अग्निरा फाउंडेशन व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम बोईसर – सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत अग्निरा फाउंडेशन आणि नवी देलवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शाळा नवी देलवाडी आणि देलवाडी विभाग हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा परिषद शाळा नवी देलवाडी येथे इयत्ता १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. हेमांगी राऊळ यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने शाळेसाठी वॉटर प्युरिफायर (RO यंत्र) प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षकवर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच, देलवाडी विभाग हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत त्यांना प्रोत्साहनही देण्यात आले. या उपक्रमाच्या प्रसंगी अग्निरा फाउंडेशनचे सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित...

पंचाळी खाडीत औद्योगिक घनकचरा जाळल्याचा प्रकार

Image
पंचाळी खाडीत औद्योगिक घनकचरा जाळल्याचा प्रकार  कारवाईसाठी प्रकरण उपप्रादेशिक अधिकारी तारापूर १ यांच्याकडे वर्ग बोईसर : पंचाळी खाडी लगत औद्योगिक घनकचरा जाळल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कारवाईसाठी प्रकरण उपप्रादेशिक अधिकारी तारापूर १ यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. ९ जून रोजी पंचाळी खाडीच्या परिसरात आगीचा धूर उठत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने बोईसर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले. यावेळी परिसरात औद्योगिक घनकचरा जाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, हा घनकचरा स्टॅंडर्ड ग्रीस या औद्योगिक कंपनीचा असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बोईसर पोलिसांनी उपप्रादेशिक अधिकारी तारापूर २ यांना पत्र पाठवून चौकशी व कारवाईची मागणी केली होती. यानंतर उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंह यांनी सदर प्रकरणाचा तपशील उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे (तारापूर १) यांच्याकडे वर्ग केला असून, पुढील चौकशी व आव...

पालघर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईचे आदेश — जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांचा इशारा

Image
पालघर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईचे आदेश — जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांचा इशारा पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बोगस वैद्यकीय व्यवसायांना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर आणि तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जिल्हास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः जिल्हाधिकारी डॉ. जाखड होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, सर्व तालुक्यांचे आरोग्य अधिकारी तसेच पोलिस विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी स्पष्टपणे सांगितले की, “समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय अर्हतांची सखोल तपासणी करावी. ही तपासणी पूर्ण केल्यानंतर पुढे नवीन उघडणाऱ्या दवाखान्यांविषयी समित्यांना माहिती मिळवणे आण...

मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात जनजीवन विस्कळीत – अनेक रस्ते बंद, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

Image
मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात जनजीवन विस्कळीत – अनेक रस्ते बंद, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा पालघर  – विक्रमगड तालुक्यात आज दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, ओहळ व पुलांना पूर आला असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार खालील मार्ग पूर्णतः बंद करण्यात आले आहेत: 1️⃣ शीळ–देहर्जे रस्ता: देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  2️⃣ सारशी–शोळशेत रस्ता: सारशी गावाजवळील ओहळावरचा मोरी पूल जलमय झाल्याने वाहतूक बंद आहे.  3️⃣ कुरंझे–कंचाड रस्ता: याठिकाणी असलेला पूल देखील पाण्याखाली गेला आहे आणि वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नदी-ओढ्यांच्या परिसरात अनावश्यक हालचाल टाळण्याचे निर्देश दिले गेले आहेत. ⛔ कृपया स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या.

कासा-चारोटी परिसरात आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक लूट — खत विक्रेत्यांचा अतिरेक; प्रशासन गप्प

Image
कासा-चारोटी परिसरात आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक लूट — खत विक्रेत्यांचा अतिरेक; प्रशासन गप्प डहाणू :  तालुक्यातील कासा-चारोटी ही बाजारपेठ परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतीसामग्री खरेदीसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. घोळ, तवा, धामटणे, नानिवली, वेती, वधना, धानीवरी, धरमपूर आदी गावांतील शेतकरी खतं, बी-बियाणे व कीटकनाशके खरेदीसाठी या ठिकाणी नियमितपणे येतात. मात्र या परिसरात काही खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असून, छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारले जात असल्याचा आरोप उघड झाला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, युरिया खताची छापील किंमत २६६ रुपये असूनही, दुकानदार २८० ते ३०० रुपये आकारतात . काही दुकानदार तर पावतीही देत नाहीत, त्यामुळे कोणतीही ठोस पुरावा न राहता शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. डीएपी, कंपोस्ट व इतर खतांबाबतही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. धानिवरी येथील शेतकरी शैलेश तांबडा यांनी सांगितले, "मी कासा येथील भरत कृषी सेवा केंद्रात खत खरेदीसाठी गेलो असता, दुकानदाराने जबरदस्तीने बी-बियाणे घेण्यास भाग पाडले. मी नकार दिल्यावर त्याने दादागिरी केली." या साऱ्या...

मनोर पोलीस ठाणे मार्फत जनसंवाद अभियानाअंतर्गत मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

Image
मनोर पोलीस ठाणे मार्फत जनसंवाद अभियानाअंतर्गत मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न   सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, बालविवाहमुक्त भारत यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पालघर : मनोर पोलीस ठाण्याच्या वतीने "जनसंवाद अभियान" अंतर्गत लालबहादूर शास्त्री विद्यालय, मनोर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये सायबर गुन्हे, महिला व बालकांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, डायल ११२ सेवा यासारख्या महत्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यशाळेमध्ये "गुड टच - बॅड टच", बालविवाह मुक्त भारत आणि महिला सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी पोलिसांशी थेट संवाद साधत आपले अनुभव, शंका व अडचणी मांडल्या. पोलीस अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरं देत मार्गदर्शन केलं. यावेळी सायकलवरून भारतभ्रमण करणाऱ्या आंध्रप्रदेशच्या गिर्यारोहक समीरा खान यांनी विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची माहिती दिली आणि नव्या पिढीला ध्येय ठरवून त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सदर कार्यशाळेत २०० ते २५० विद्यार...

पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांतील हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू

Image
पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांतील हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू सर जे. जे. रुग्णालय व जिल्हा प्रशासनाचा संयुक्त उपक्रम पालघर : पालघर जिल्ह्यातील सर्व 33 आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाची सुरुवात आज नंडोरे येथील आश्रमशाळेमधून झाली. सर जे. जे. समूह रुग्णालय व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई अंतर्गत असलेल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र आणि आरोग्य पथक, पालघर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सर्व आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या तपासणीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींचा बारकाईने आढावा घेण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार उपचार आणि पुढील वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे. आज नंडोरे आश्रमशाळेत झालेल्या पहिल्या शिबिरात एकूण 500 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांन...

पंचाळीत औद्योगिक घनकचऱ्याच्या ढिगास भीषण आग

Image
पंचाळीत औद्योगिक घनकचऱ्याच्या ढिगास भीषण आग औद्योगिक घनकचऱ्याच्या चोरट्या विल्हेवाटीचा पर्दाफाश; स्टॅंडर्ड ग्रीस कारखान्यावर संशयाची सुई बोईसर : पंचाळी ग्रामपंचायत हद्दीतील विचारे कन्स्ट्रक्शनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खाडीच्या किनाऱ्यावर रविवारी (दि.९) सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे उठणाऱ्या काळसर धुरामुळे आणि उग्र वासामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पाहणी केली असता, या भागात औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतून फेकण्यात आलेला घनकचरा आढळून आला. भंगार मिळवण्यासाठी अज्ञात व्यक्तीने या ढिगास पेटवून दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या तीव्रतेमुळे आसपासचे कांदळवन जळून खाक झाले असून, परिसरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे बोईसर-पालघर मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला. बोईसर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. तपासणीदरम्यान आढळून आले की, घटनास्थळी जळलेल्या कचऱ्यात स्टॅंडर्ड ग्रीस कंपनीचे प्रिंटेड प्लास्ट...