तलासरीत मोठी कारवाई : १३.२४ लाखांचा अवैध दारू साठा पकडला, आरोपी अटकेत
तलासरीत मोठी कारवाई : १३.२४ लाखांचा अवैध दारू साठा पकडला, आरोपी अटकेत
आरोपी रत्नेश उपाध्याय याने आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH 48 CQ 1981) या वाहनात दादरा नगर हवेली येथून आणलेला दारू साठा विनापरवाना भरून गुजरात राज्यात नेण्यासाठी तलासरी मार्गे वाहतूक करत होता. पोलिसांनी उधवा नवापाडा परिसरात सापळा लावून वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर देशी दारू आढळून आली.
या दारू साठ्याची एकूण अंदाजे किंमत ₹13,24,000/- इतकी असून, वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे, तसेच तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे, पोलीस उपनिरीक्षक जयराम उमतोल, सफौ. हिरेमण खोटरे, पो.ह.वा. प्रविण चौरे आणि पो.अं. संदीप चौधरी यांच्या पथकाने केली.
तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “तलासरी परिसरात अवैध दारू वाहतूक, जुगार, अंमली पदार्थ, गुटखा यांसारखे गैरधंदे कुठेही सुरू असल्याची माहिती असल्यास मोबाईल नंबर ९६२३९६१००० वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईमुळे तलासरी परिसरातील अवैध दारू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांना धक्का बसला असून पोलिसांची ही ठोस कारवाई स्थानिकांतून कौतुकास पात्र ठरत आहे.
Comments
Post a Comment