गिरगाव आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची वस्तीगृहात आत्महत्या; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

गिरगाव आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची वस्तीगृहात आत्महत्या; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पालघर  : डहाणू तालुक्यातील गिरगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, नववीत शिक्षण घेत असलेल्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीने वस्तीगृहात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.

पल्लवी खोटरे हिने वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी रॉडला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.


या घटनेमुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थिनीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


स्थानिक ग्रामस्थ व पालक वर्गामध्ये या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून, वस्तीगृहांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेचा तपास सुरू असून विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक तपशील स्पष्ट होईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू