मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात जनजीवन विस्कळीत – अनेक रस्ते बंद, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यात जनजीवन विस्कळीत – अनेक रस्ते बंद, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
पालघर – विक्रमगड तालुक्यात आज दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, ओहळ व पुलांना पूर आला असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार खालील मार्ग पूर्णतः बंद करण्यात आले आहेत:
1️⃣ शीळ–देहर्जे रस्ता: देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
2️⃣ सारशी–शोळशेत रस्ता: सारशी गावाजवळील ओहळावरचा मोरी पूल जलमय झाल्याने वाहतूक बंद आहे.
3️⃣ कुरंझे–कंचाड रस्ता: याठिकाणी असलेला पूल देखील पाण्याखाली गेला आहे आणि वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नदी-ओढ्यांच्या परिसरात अनावश्यक हालचाल टाळण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
⛔ कृपया स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या.
Comments
Post a Comment