एक हात मदतीचा विद्यार्थ्यांसाठी!" — अग्निरा फाउंडेशन व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
"एक हात मदतीचा विद्यार्थ्यांसाठी!" — अग्निरा फाउंडेशन व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
बोईसर – सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत अग्निरा फाउंडेशन आणि नवी देलवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शाळा नवी देलवाडी आणि देलवाडी विभाग हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा नवी देलवाडी येथे इयत्ता १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. हेमांगी राऊळ यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने शाळेसाठी वॉटर प्युरिफायर (RO यंत्र) प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षकवर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
तसेच, देलवाडी विभाग हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत त्यांना प्रोत्साहनही देण्यात आले.
या उपक्रमाच्या प्रसंगी अग्निरा फाउंडेशनचे सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि असे उपक्रम नियमितपणे राबवले जातील, असे आश्वासन दिले.
अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आवश्यक ती मदत मिळते आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पसरतो.
Comments
Post a Comment