वाढवण बंदराच्या विरोधात समुद्रात जलसमाधी आंदोलन; स्थानिकांचा संतप्त विरोध
वाढवण बंदराच्या विरोधात समुद्रात जलसमाधी आंदोलन; स्थानिकांचा संतप्त विरोध
पालघर – वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांचा आक्रोश अधिक तीव्र होत असून आज त्यांनी थेट समुद्रात उतरून ‘जलसमाधी आंदोलन’ केलं. जेएनपीटी कडून सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेला विरोध करत नागरिकांनी वाढवण समुद्रकिनारी घोषणाबाजी करत समुद्रात उतरून आंदोलन छेडलं.
बंदर उभारणीच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या लाटांचे निरीक्षण करण्यासाठी जेएनपीटीकडून एका खासगी संस्थेला ड्रोन सर्व्हेचं काम दिलं आहे. हे सर्वेक्षण पोलिस बंदोबस्तात सुरू असतानाच स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी समुद्रात उतरून तीव्र विरोध नोंदवला.
आंदोलकांनी सांगितले की, “हा बंदर प्रकल्प आमचं समुद्रावरचं हक्काचं जीवन हिरावून घेणार आहे. मच्छीमारांची उपजीविका संपवणारा हा प्रकल्प कदापि मान्य नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण बंदर होऊ देणार नाही.”
या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते, मात्र आंदोलकांचा निर्धार कायम आहे.
Comments
Post a Comment