मेडली फार्मास्युटिकल्स व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल
मेडली फार्मास्युटिकल्स व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेड या औषधनिर्मिती कंपनीत झालेल्या वायुगळतीच्या भीषण दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी कारखाना व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला असून औद्योगिक व आरोग्य संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. गुरुवारी (२१ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेदरम्यान रिऍक्टरमधून अचानक विषारी वायू गळती झाली. यात सहा कामगार बाधित झाले. त्यांना तातडीने बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सहाय्यक व्यवस्थापक कल्पेश राऊत (३८), बंगाली ठाकूर (३८), धनंजय प्रजापती (३०) आणि कमलेश यादव (३०) यांचा मृत्यू झाला. तर उत्पादन व्यवस्थापक रोहन शिंदे (३५) आणि निलेश हाडळ (३२) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून कारखाना व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला. मृत कामगार कमलेश यादव याच्या भावाने, सुरक्षाविषयक साधनांचा अ...