बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे भर बाजारात रेल्वे पोलिस कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

बोईसर रेल्वे स्टेशनवर ड्युटीवर असताना संशयास्पदरीत्या भटकणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात आला होता. याच रागातून आरोपी सूरज गुप्ता याने संध्याकाळी बोईसर मार्केट परिसरात रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल नरेश दळवी यांच्यावर हल्ला केला.


यावेळी दळवी यांच्यासोबत असलेल्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीला जागेवरच पकडून बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे, आरोपीने हल्ल्याचा व्हिडिओ तयार करण्यासाठी दुसऱ्याकडे मोबाईल देऊन चित्रीकरण करण्यास सांगितल्याचंही समोर आलं आहे.


सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर मुंढे करत आहेत.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक