के.जी.एन. फार्मास्युटिकल कारखान्यात कामगाराचा करंट लागून मृत्यू
के.जी.एन. फार्मास्युटिकल कारखान्यात कामगाराचा करंट लागून मृत्यू
बोईसर : बोईसर दांडीपाडा येथील रहिवासी व रेल्वे स्थानक परिसरात नाका कामगार म्हणून काम करणारा ३० वर्षीय राज पंडित याचा के.जी.एन. फार्मास्युटिकल कारखान्यात करंट लागून मृत्यू झाल्याची घटना (१५ ऑगस्ट) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ठेकेदार रूपेश महाले यांच्या सांगण्यावरून पंडित यांनी कारखान्यातील प्रवेशद्वार ब्रेकरच्या सहाय्याने तोडून मोठे करण्याचे काम सुरू केले होते. काम झाल्यावर राज पंडित याने ब्रेकरला जोडलेली विद्युत पुरवठा करणारी वायर आवरण्यास सुरुवात केली असता अचानक त्यांना तीव्र विद्युत धक्का बसला. कारखाना बंद असल्याने घटनास्थळी कोणी नसल्यामुळे पंडित काही वेळ तडफडत राहिले आणि जागीच मृत्यू झाला.
सकाळी सुमारे ११.३० वाजता त्यांना वरद मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास बोईसर पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, औद्योगिक क्षेत्रात याच महिन्यात अशा प्रकारची ही चौथी घटना घडली असून औद्योगिक सुरक्षा संचलन विभागाचे अधिकारी नेमके काय काम करतात, असा संतप्त प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment