दीपक प्लास्टो कंपनीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
दीपक प्लास्टो कंपनीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
बोईसर – तारापूर एमआयडीसी परिसरातील दीपक प्लास्टो (प्लॉट नंबर जे १) कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विमल दुबे (वय ५६) यांचा काल (११ ऑगस्ट २०२५) दुर्दैवी मृत्यू झाला. दुबे हे सिंग सेक्युरिटी सर्विसमार्फत कंपनीत कार्यरत होते.
सकाळी साडेअकराच्या सुमारास ते बाथरूमला गेले, मात्र बराच वेळानंतरही बाहेर न आल्याने कामगारांना संशय आला. त्यांनी मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. शोध घेतल्यावर फोनचा आवाज बाथरूममधून येत असल्याचे लक्षात आले. दरवाजा तोडून पाहिले असता दुबे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
त्यांना तातडीने टीमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,
मात्र दुपारी २.२० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
“मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, रिपोर्ट मिळेपर्यंत मृत्यूचे कारण सांगता येणार नाही,” असे टीमा हॉस्पिटलचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment