घरफोडी प्रकरणात आरोपीस अटक; ३.२९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी प्रकरणात आरोपीस अटक; ३.२९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बोईसर – तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील कुरगाव, गोकुळनगर येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी केलेल्या दागिन्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांच्या पथकाने एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून ३,२९,०५३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक ३ जून २०२५ रोजी रात्री ते ४ जून रोजी सायंकाळी राधा बिल्डिंग, गोकुळनगर येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे केला असता आरोपी साजीद अकबर शेख (वय ३४, रा. नालासोपारा पूर्व) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शावेज अनवर खान (रा. नालासोपारा पश्चिम) याचा शोध सुरू आहे.


ही कारवाई  पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (बोईसर विभाग) विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  प्रदीप पाटील, तारापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  निवास कणसे, पोउपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई, रविंद्र वानखेडे, गोरखनाथ राठोड, पोहवा दिनेश गायकवाड, राकेश पाटील, संदीप सरदार, भगवान आव्हाड, रामचंद्र तांबडा, पोअं विशाल लोहार, विशाल कडव, चापोअं अवतार, जितेंद्र वसावे आणि संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पथकाने संयुक्तरित्या केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक