पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पालघर – हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

खाडी, नदी व नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी 02525-297474, +918237978873 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज (दि. 19 ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे निर्देश कार्यालयप्रमुखांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, उद्या (दि. 20 ऑगस्ट) शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करायची की नाही याबाबतचा निर्णय पावसाच्या स्थितीनुसार आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

👉 नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक