ऋषिकेश सिल्क मिल कंपनीतील मशीनमध्ये साडी अडकल्याने महिला कामगार जखमी

ऋषिकेश सिल्क मिल कंपनीतील मशीनमध्ये साडी अडकल्याने महिला कामगार जखमी

बोईसर : तारापूर एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील ऋषिकेश सिल्क मिल (प्लॉट नंबर एल-७५) या कपडे बनवणाऱ्या कंपनीत सफाई काम करणाऱ्या मंजू यादव (वय ४१) या महिला कामगाराचा दुर्दैवी अपघात होऊन त्या गंभीर जखमी झाल्याची घटना ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी घडली आहे.

मंजू यादव या सदर कंपनीत साफसफाईचे काम करतात. दुपारी कामाच्या वेळी त्या झाडू मारत असताना त्यांच्या साडीचा पदर जवळच असलेल्या कपड्यांच्या मशीनमध्ये अडकला. त्यामुळे त्या अनियंत्रितपणे मशीनमध्ये अडकून गोल फिरल्या मात्र यात त्यांच्या डाव्या मांडीवर जोरदार मार बसला व त्या अपघातात त्यांच्या मांडीला जखम झाली असून त्यांना आठ टाके पडले आहेत.


अपघातानंतर कंपनीतील इतर कामगारांनी धाव घेत त्यांना मशीनमधून बाहेर काढले व तातडीने बोईसर येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, अजूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.


कंपनीत सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याचा आरोप केला जात आहे. "साफसफाई करत असताना मशीन सुरू का होते? महिला कामगारांना योग्य सुरक्षा साधने का दिली जात नाहीत?" असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे कंपनी वर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित पोलिसांना व औद्योगिक सुरक्षा विभाग यांनाही देण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे.


तसेच कंपनी चे मॅनेजर सिंग यांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनीही घटनेबाबत बोलण्यात टाळाटाळ केली.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक