संजय पाटील यांच्या प्रयत्नातून संजीवनी तरे यांना १३ लाखांची नुकसानभरपाई

संजय पाटील यांच्या प्रयत्नातून संजीवनी तरे यांना १३ लाखांची नुकसानभरपाई

अपघातात पती गमावलेल्या संजीवनी तरे यांना न्याय; शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या प्रयत्नांना यश

बोईसर – मुरबे येथील संजीवनी संजय तरे यांचे पती कामावर असताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले. कंपनीने नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्याने संजीवनी तरे यांना न्याय मिळत नव्हता. मात्र, शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केलेल्या ठाम पाठपुराव्यामुळे अखेर १३ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.

कै. संजय नथुराम तरे (वय ४९) हे एम/एस रेस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड, बोईसर येथे कार्यरत होते. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ऑन ड्युटी काम करत असताना त्यांच्या अंगावर ४०० ते ५०० किलो वजनाची क्रेन पडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम आनंद हॉस्पिटल, बोईसर येथे आणि नंतर ऑर्बिट हॉस्पिटल, मीरा रोड येथे दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान पोटातील आतडी फाटल्याचे निदान झाले होते. उपचार सुरू असूनही तब्येत सतत बिघडत गेली आणि २५ मार्च २०२५ रोजी त्यांचे निधन झाले.


उपचारांवर कंपनीने २० ते २२ लाख रुपये खर्च केले होते, तरीही पुढील नुकसानभरपाई देण्यास कंपनीने नकार दिला. वारंवार मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने संजीवनी तरे यांनी संजय पाटील यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. संजय पाटील यांनी तातडीने पाठपुरावा सुरू करून काही दिवसांतच कंपनीकडून १३ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळवून दिली.


या मदतीबद्दल संजीवनी तरे यांनी सांगितले की ,“साहेबांनी दिलेला शब्द खरा करून मला योग्य तो न्याय मिळवून दिला. त्यांच्या या मदतीबद्दल मी सदैव ऋणी राहीन.”



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक