केळवेतील रिसॉर्टमध्ये गोळी लागून १७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी

केळवेतील रिसॉर्टमध्ये गोळी लागून १७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी पालघर : पालघर जिल्ह्यातील केळवे येथील एका खाजगी रिसॉर्टमध्ये फिरायला गेलेल्या १७ वर्षीय तरुणीवर गावठी कट्ट्यातून चुकून गोळी झाडली गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (३० मे) दुपारी घडली. या गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी तरुणीचे नाव तेजल भिडे असून ती बोईसरजवळील लोखंडीपाडा येथील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार, तेजल भिडे ही तिचा प्रियकर दिनेश धोडी (रा. लोखंडीपाडा) याच्यासोबत केळवे येथील रिसॉर्टमध्ये थांबली होती. रूममध्ये पोहोचल्यानंतर दिनेश वॉशरूममध्ये गेला असताना तेजलने त्याची बॅग तपासली. त्या बॅगेत तिला गावठी कट्टा आढळला. कुतूहलातून तिने कट्टा बाहेर काढून पाहणी करत असताना चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी झाडली गेली. ही गोळी तिच्या मानेला लागून आतमध्ये अडकली. घटनेनंतर घाबरलेल्या दिनेशने तत्काळ रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि जखमी तेजलला पालघरमधील माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला ...