बोईसरमधील अपूर्ण डिव्हायडरमुळे युवकाचा मृत्यू – युवकांचा पुढाकार प्रशासनासाठी धडा

बोईसरमधील अपूर्ण डिव्हायडरमुळे युवकाचा मृत्यू –  युवकांचा पुढाकार प्रशासनासाठी धडा

बोईसर – बोईसरमधील यशवंत सृष्टी परिसरात साईबाबा मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावरील अपूर्ण डिव्हायडर आणि खड्ड्यांनी पुन्हा एकदा भीषण अपघाताचे कारण ठरवत एक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

या अपघातानंतर काही युवकांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारत पुढाकार घेतला असून डिव्हायडरजवळ स्वतःहून खांब बसवले आहेत. त्यांनी हे खांब पिवळ्या रंगाने रंगवून रेडियम स्टिकर्स लावले, जेणेकरून वाहनचालकांना ते लांबून 

स्पष्ट दिसतील आणि भविष्यातील अपघात टाळता येतील.


या कार्यामध्ये  राहुल सिंग, शुभम सिंग, मंगेश नागणे, अमोल गर्जे, राम शुक्ला, आकाश सिंग आणि संभाजी शिरसाट यांचा उल्लेखनीय सहभाग आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर या युवकांनी समाजासाठी एक प्रेरणादायक उदाहरण घालून दिले आहे.


परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, सदर डिव्हायडरचे काम तातडीने पूर्ण करावे, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि वाहतुकीस सुरक्षित बनवण्यासाठी आवश्यक उपाय तत्काळ राबवावेत.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक