बोईसर साईबाबा मंदिराजवळील डिव्हायडरबाबत शिवसेना आक्रमक; PWD ला निवेदन
बोईसर साईबाबा मंदिराजवळील डिव्हायडरबाबत शिवसेना आक्रमक; PWD ला निवेदन
आठ दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
शिवसेनेचे बोईसर शहरप्रमुख अतुल देसाई, विभागप्रमुख अजय दिवे, व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत या रस्त्याची दुरवस्था, वाढलेले अपघात, आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने होणारे परिणाम याकडे लक्ष वेधले.
निवेदनातील मुख्य मागण्या
◾धोकादायक डिव्हायडरची रचना योग्य पद्धतीने बदलून तातडीने दुरुस्ती/पुनर्बांधणी करावी.
◾रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवून रस्ता समतल व गुळगुळीत करावा.
◾दिशादर्शक रस्ता चिन्हे, झेब्रा क्रॉसिंग, व रेडियम रिफ्लेक्टर बसवावेत.
◾वाहनचालकांना वेग मर्यादेची जाणीव व्हावी यासाठी स्पीड ब्रेकर किंवा रंबल स्ट्रिप्स बसवावेत.
◾रात्रीच्या वेळी अपुरी असलेली प्रकाशव्यवस्था सुधारून योग्य प्रकाशयोजना करण्यात यावी.
या वेळी अतुल देसाई म्हणाले, “रस्त्यावरील ही स्थिती जनतेच्या जीवाशी खेळ करणारी आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा, शिवसेनेला जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
Comments
Post a Comment