गुंदले गावातील करमतरा कंपनीच्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोधच

गुंदले गावातील करमतरा कंपनीच्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोधच 

प्रेस नोटद्वारे दिशाभूल केल्याचा आरोप



बोईसर :
गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील पांजरे पाडा (गुंदले) येथील सर्वे नंबर ६०/१/१ ते ६०/१/७, ६१, ६२ आणि आजूबाजूच्या जमिनींवर करमतरा कंपनीकडून प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पास ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत आहे. अलीकडेच कंपनीने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटविरोधात ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करत ती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे.


ग्रामस्थानी आरोप केला आहे की, कंपनीकडून एनओसी मिळवण्यासाठी पोलिसी दबाव, बळजबरी आणि आर्थिक प्रलोभनांचा वापर केला जात आहे. याआधी अशाच प्रकारची घटना तळेखल (मान चुरी पाडा) येथील एनक्राफ्ट कंपनीबाबत घडली होती, असे ग्रामस्थांनी सांगितले. सुरुवातीला ग्रामसभा विरोधात होती, मात्र तिसऱ्या ग्रामसभेत दबाव व पैसे वाटप झाल्याचा आरोप करत ते म्हणाले की, परिणामी आज त्या भागातील पाणी दूषित झाले असून आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत.


विराज कंपनीच्या प्रकरणाचा दाखला देताना ग्रामस्थ म्हणाले की, झाडे लावण्याच्या निमित्ताने एनओसी घेतली गेली. परंतु काही दिवसांतच झाडे काढून तिथे पक्के बांधकाम करण्यात आले. यानंतर ग्रामस्थांना कंपनीत प्रवेशही नाकारण्यात आला. विनोद कुकवेअर, लक्ष्मी डेंटल यांसारख्या कंपन्यांचेही असेच अनुभव असल्याचे सांगण्यात आले.


ग्रामस्थांनी स्पष्टपणे नमूद केले की, पेसा कायद्यानुसार ग्रामसभेचा ठराव होईपर्यंत कोणतीही ग्रीन कन्सल्ट किंवा मान्यता देणे बेकायदेशीर आहे. करमतरा कंपनीने प्रसिद्ध केलेली प्रेस नोट ही अपूर्ण, अपात्र आणि दिशाभूल करणारी आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक