विमल व अन्य तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक; दोन किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल

विमल व अन्य तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक; दोन किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल

पालघर – पालघर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. याप्रकरणी दोन किराणा दुकानदारांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई

 दि. २७ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.१० वाजता देवीशा रोडवरील 'राजेश जनरल स्टोअर' या दुकानात ही कारवाई करण्यात आली. दुकानाचे मालक पुखराज कारुलाल जैन (वय ७०) यांनी २,१४० रुपये किमतीचे विमल पान मसाला, केसरयुक्त पान मसाला आणि तंबाखू असे विविध प्रकारचे बंदी घालण्यात आलेले अन्नपदार्थ साठवून ठेवले होते. यावरून त्यांच्याविरोधात बीएनएस कलम २२३, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसरी कारवाई

त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास खानपाडा येथील 'न्यू भैरु भवानी स्टोअर' येथे देखील छापा टाकण्यात आला. येथे प्रेमसिंग देविसिंगजी राठोड (वय २३) याच्या दुकानातून २,९१८ रुपये किमतीचे विविध बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये 'विमल', 'राजनिवास' आणि अन्य सुगंधीत पान मसाल्यांचा समावेश होता. या प्रकरणातही अन्न सुरक्षा कायदा २००६ तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ आणि २७३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दोन्ही प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा विभाग आणि पालघर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संबंधित दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाई केली असून, तपास सुरू आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक