Posts

Showing posts from August, 2024

मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच भूमिपूजन...

Image
मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच भूमिपूजन... मच्छीमारांनी होड्याना काळे झेंडे व फुगे लावून व्यक्त केला निषेध  पालघर : एका बाजूला देशाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असताना दुसरीकडे मात्र स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी या विनाशकारी बंदराला विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा सिडको मैदानात होणार असताना प्रस्तावित बंदराला  विरोध करण्यासाठी पालघरला चाललेल्या स्थानीक आंदोलकांना पोलिसांनी त्या भागातच रोखल्या मुळे स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून समुद्रामध्ये आपल्या बोटीना काळे फुगे लावण्यात आले होते तसेच काही बोटींवर काळे झेंडे लावुन आंदोलनाला सुरवात केली होती. धाकटी डहाणू गावातील मच्छीमार बांधवांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाविरोधात निषेधार्थ काळे झेंडे, काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढली होती. याचबरोबर एका बाजूला वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र विरोधी संघटना आणि महाविकास आघाडी  ही आक्रमक झाली होती .पालघरच्या वरोर - वाढवण येथे वा...

तारापूर पोलीस ठाणे हद्दीत नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Image
तारापूर पोलीस ठाणे हद्दीत नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार तारापूर : राज्यात विरोधी पक्षांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मूक आंदोलन सुरू असताना एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी महिला आणि मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीत कुडन या गावात १४ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असुन तारापूर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, जव्हार येथुन कामानिमित्त कुडन ग्रामपंचायत हद्दीतील नवीन चिंचपाडा येथे राहत असलेला आरोपी रामा बोये याने आईवडिलांसोबत रहात असलेल्या १४ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची तक्रार शनिवारी दि.24 रोजी तारापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.  आरोपी रामा बोये याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४/१ व पॉस्को कायदा अंतर्गत कलम ४,८,१२ प्रमाणे तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला काल न्यायालयासमोर हज...

बोईसरमध्ये तरुणीवर घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Image
बोईसरमध्ये तरुणीवर घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल   बोईसर : बोईसर शहरालगत सिध्दार्थ नगर येथे  एका २२ वर्षीय तरुणीवर घरात घुसून तरुणाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली असून या प्रकरणी बोईसर पोलिसांनी सूरज फडतरे या तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.  गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असून महिलांवर होणाऱ्या अत्याचारात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यात पुन्हा एकदा बोईसर पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे. बोईसर मधिल सिद्धार्थ नगर निरंकारी भवन परिसरामध्ये एका युवतीवर शेजारी राहणाऱ्या सुरज फडतरे या तरुणांनी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत  जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर पीडित तरुणी ही बोईसर येथील सिद्धार्थ नगर निरंकारी भवनच्या जवळ आ...

पाम ग्रामपंचायती तर्फे २५ दिव्यांगाना निधी वाटप

Image
पाम ग्रामपंचायती तर्फे २५ दिव्यांगाना निधी वाटप  पालघर : पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायतीच्या वतीने पाम गावातील दिव्यांग व्यक्तींना दि.२२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अर्थसहाय्य निधि वाटप करण्यात आले . पाम ग्रामपंचायतीच्या वतीने पाम गावातील दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत पाम च्या आर्थिक उत्पन्नातुन 5 टक्के दिव्यांग निधी वाटप अर्थसहाय्य म्हणून सहा हजार रुपये चा धनादेश गावातील २५ दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार व साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सरपंच दर्शना पिंपळे , उपसरपंच मनोज पिंपळे, ग्रामसेवक अरविंद संखे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते  निधिचे वाटप करण्यात आली.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पालघर येथे शिवसेना उबाठा गटाकडून तीव्र निषेध आंदोलन

Image
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पालघर येथे शिवसेना उबाठा गटाकडून तीव्र निषेध आंदोलन पालघर : 'नको आम्हला लाडकी बहीण, आम्हाला हवी सुरक्षित बहीण' च्या घोषणेने पालघर शहरातील हुतात्मा चौक दुमदुमून गेला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पालघर येथे शिवसेना उबाठा गटाकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या, अशी घोषणा ही करण्यात आली, यावेळी शिवसेना उबाठा गटाचे महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अजय ठाकूर पत्रकारांशी बोलता म्हणाले की बदलापूर मध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला, तसेच पुण्यामध्ये, नाला सोपारा मध्ये व अश्या अनेक ठिकाणीं महिलांवर अत्याचार सुरू आहे. परंतु हे सरकार दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई करत आहे. बदलापूर घटनेला बारा तास पेक्षा जास्त काळ उलटून ही हे सरकार कारवाई करण्यात दिरंगाई करत आहे. महाराष्ट्रात अश्या अत्याचार वारंवार महिलांवर होत आहे, राज्यात महिला सुरक्षित नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारने लाडकी बहीण योजने ऐवजी सुरक्षित महिला योजना राबवली पाहिजे.   जिल्हा प्रमु...

उत्तम केमिकल कारखान्यात सूरक्षे अभावी कामगाराला गमाववा लागला जीव

Image
उत्तम केमिकल कारखान्यात सूरक्षे अभावी कामगाराला गमवावा लागला जीव बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दिवसागणिक अपघातात वाढ होऊ लागलेली असून उत्तम केमिकल कंपनीत सुरक्षे अभावी एका ३२ वर्षीय कामगाराला जीव गमवावा लागला. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात  उत्तम केमिकल भूखंड क्रमांक टी-८७ ह्या कारखान्यात पत्रे टाकण्याचे काम करणाऱ्या गोरेलाल सिंग या कामगाराचा सूरक्षे अभावी अचानक खाली पडून मृत्यू झाला . ४ऑगस्ट आणि ५ ऑगस्ट दरम्यान या  ठेकेदार महेश राणे यांच्यामार्फत उत्तम केमिकल कंपनीत पत्रे चढवण्याचे काम सुरू असताना अचानक ३२ वर्षीय गोरेलाल सिंग खाली पडून गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ च्या सुमारास  कामगाराचा मृत्यू झाला.  मृत कामगार गोरेलाला सिंग ह्याच्या कुटुंबात पत्नी व २ वर्षांची मुलगी असा परिवार आहे, कामगाराच्या मृत्यूची बातमी समजताच निलेश राणे कॉन्ट्रॅक्टर कामगाराचा मृतदेह रुग्णालयात सोडून पळून गेला, पीडित कुटुंबाच्या जबाबदारी स्वीकारण्यास कारखानदार नकार देत असून कुटुंबीयांनी पालघर जिल्हा प्रशासन औद्योगिक संचालनालय (डीश)आणि...

नंडोरे देवखोप ग्रृप ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानांकन

Image
नंडोरे देवखोप ग्रृप ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानांकन पालघर : पालघर जिल्ह्यातील नंडोरे देवखोप ग्रृप ग्रामपंचायतीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आज दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जि प पालघर येथील बिरसामुंडा सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नंडोरे देवखोप ग्रृप ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनल घाटके, माजी उपसरपंच रोहन वेडगा, ग्रामविकास अधिकारी निलेश देवरे, ग्रा पं सदस्य सुचिता पाटील, मानसी तरे यांचा सत्कार करून ग्रृप ग्रामपंचायत नंडोरे- देवखोप यांना आयएसओ ९००१:२०१५ नामांकन दर्जा प्राप्त प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी जि प अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित, पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वनगा, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जि प उपाध्यक्ष पंकज कोरे, सभापती रोहिणी शेलार, सभापती संदीप पावडे, सभापती मनीषा निमकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, विस्तार अधिकारी माळी, पुरस्कार प्राप्त गुणवंतांचे कुटुंबीय, जिल्हा परिषद अधिकारी व कर...

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

Image
स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी पालघर : अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार असून या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांनी अर्ज भरावेत आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे असा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने ठराव झाला होता.  त्या अनुषंगाने आज दिनांक आज दिनांक 14 जुलै रोजी  जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या दालनात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद मध्ये भरण्यात येणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात केवळ स्थानिक उमेदवारांनी अर्ज भरावेत पालघर जिल्हा बाहेरील पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज देखील करू नये असे एकमताने आवाहन करण्यात आले. यावेळी मा.सभापती मनीषाताई निमकर आणि सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. जर बाहेरील पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज केल्यास सर्व जिल्हा परिषद सदस्...

पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी घेतली लाच आणि एसीबीने त्यांना पकडले रंगेहाथ

Image
पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी घेतली लाच आणि एसीबीने त्यांना पकडले रंगेहाथ पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यावर मुंबई लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना आदिवासी जमीन प्रकरणात ५० हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यात झालेली असताना त्यांनी पदभार सोडलेला नव्हता पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून याठिकाणी विविध प्रकल्पाकरता मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण सुरू असून भूसंपादन होत असताना आदिवासींच्या जमिनी तसेच सरकारी जमीनी धनाढ्यांच्या घशात घालण्यासाठी कागदपत्रांची रंगरंगोटी या कार्यालयात केली जात असल्यामुळे पालघर जिल्ह्यावर या अधिकाऱ्यांना मोहमायाचा प्रेम ऊतू आलेला आहे त्यामुळेच बदली झालेली असताना देखील त्याच ठिकाणी दिर्घकाळ थांबून राहणे आता चांगलाच महागात पडलेला आहे. वाडा येथील एका आदि...

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वेलियंट ग्लास वर्क प्रा.लि कारखान्यात एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू ....

Image
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वेलियंट ग्लास वर्क प्रा.लि कारखान्यात एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू .... बोईसर : दि.६ ऑगस्ट रोजी तारापुर औद्योगिक क्षेत्रातील जे -८५ वेलियंट ग्लास वर्क प्रा लि या कारखान्यात गुलाब जयस्वाल या कंत्राटी कामगाराला मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे  तारापुर औद्योगिक क्षेत्रातील जे -८५ वेलियंट ग्लास वर्क प्रा. लि या कारखान्यात दि.६ ऑगस्ट मंगळवारी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान गुलाब जयस्वाल या कंत्राटी कामगाराला  जीव गमवायची वेळ आलेली आहे. ३२ वर्षीय गुलाब जयस्वाल बोईसर येथील धनानी नगर येथे राहत असून पप्पू पुनिया या ठेकेदाराच्या ठेक्यात तो हेल्पर म्हणून कार्यरत होता. यात पप्पू पुनिया यांनी आपला नाव कुठे येऊ नये म्हणून अतुल सिंह नामक एका व्यक्तीला उभा करून कामगाराच्या मृत्यू बाबत पत्रकारांना माहिती देत असल्याचे निदर्शनास येताच मृत्यूचे खरे कारण उघडकीस येऊ नये म्हणून माहिती देणाऱ्या कामगाराला धमकावत बाजूला खेचत नेण्याचे काम या फंटर कडून करण्यात आल्याचे टिमा रूग्णालयाच्या प्रवेश द्वाराजवळ दिसून आले. गुलाब जयस्वाल या कामगाराचा घसरून गटारीत पडून अपघाती मृत्यू झ...

राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पाच लाख तर जिल्हास्तरीय विजेत्यांला पंचवीस हजाराचे बक्षीस

Image
राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पाच लाख तर जिल्हास्तरीय विजेत्यांला पंचवीस हजाराचे बक्षीस   पालघर :  महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. परिपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com / palghargeneral220@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल.    सदर स्पर्धा नि:शुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरीता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक सजावट, ध...

रणकोळ आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा, कासा रुग्णालयात उपचार सुरू

Image
रणकोळ आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा, कासा रुग्णालयात उपचार सुरू पालघर : पालघरमधील एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ विद्यार्थिनींना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या २७ विद्यार्थिनींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने या विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जेवणातून आणि पाण्यातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बोईसर ग्रामपंचायत हद्दित पालघर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुकुंद शर्मा ने केले अनधिकृत बांधकाम

Image
बोईसर ग्रामपंचायत हद्दित पालघर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुकुंद शर्मा ने केले अनधिकृत बांधकाम पालघर !  बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील  सर्वे नंबर ३१ /१  व सर्वे नंबर ३१/२ परमाणु नगर येथील भूखंड क्रमांक ६ ते १४  असे एकूण क्षेत्रफळ ५२७१ चौरस मीटर क्षेत्राचे भूखंड न्यूक्लिअर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांनी मा. अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील आदेश क्रमांक एन एपी/एस आर /३९/९७ दिनांक २५ /०२ /१९९७ रोजीच्या आदेशान्वये रहिवाशी प्रयोजनार्थ बिनशेती केलेला असल्याचे नमूद केले आहे . प्रत्यक्षात जागेवर हे बांधकाम  तळमजला अधिक एक मजला यापेक्षा जास्त बांधकाम असू नये अशी अट या आदेशात देण्यात आली आहे. असे असताना प्लॉट नंबर ६ए/ मुकुंद व्हि .शर्मा यांचा आहे . या मध्ये त्याने नियमाचे उल्लंघन करून अनधिकृत पणे बांधकाम सुरू केले आहे. या अनधिकृत बांधकामा संदर्भात पालघर दिवाणी न्यायालयात ही केस सुरू असताना ह्या केसच्या सर्व बाजू पाहून  न्यायाधीशांनी मुकुंल शर्मा ह्याला दि.२५/०६/२०२४ रोजी दिवाणी न्यायालयातून आदेश पारित करण्यात आला की , दुसऱ्या मजल...

पोमण ग्रामपंचायती मधील बेकायदा बांधकामा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर तिरडी आंदोलन

Image
पोमण ग्रामपंचायती मधील बेकायदा बांधकामा विरोधात  जिल्हाधिकारी कार्यालया समोर तिरडी आंदोलन पालघर: वसई तालुक्यातील पोमण या ग्रामपंचायती अंतर्गत अनेक अनधिकृत बांधकामे झालेले आहेत. या विरोधात तक्रार दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ अर्जदार नानासाहेब कोळेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी आंदोलन करण्यात आले. पोमण या ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. या बांधकामामुळे दोन मजुरांचा जीव देखील गेला होता. ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय येथे वारंवार अनधिकृत बांधकामे तोडण्यासंदर्भात मागणी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.परिणामी या प्रकाराच्या निषेधार्थ आंदोलन करत असल्याचे कोळेकर यांनी म्हटले आहे. वसईचे तहसीलदार यांनी विकासकांसोबत आर्थिक व्यवहार साधत अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याचे आरोप कोळेकर यांनी केले आहेत. मागणीची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी आंदोलन कोळेकर यांच्यामार्फत सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी कारवाईचे आश...