पाम ग्रामपंचायती तर्फे २५ दिव्यांगाना निधी वाटप
पाम ग्रामपंचायती तर्फे २५ दिव्यांगाना निधी वाटप
पालघर : पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायतीच्या वतीने पाम गावातील दिव्यांग व्यक्तींना दि.२२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अर्थसहाय्य निधि वाटप करण्यात आले .
पाम ग्रामपंचायतीच्या वतीने पाम गावातील दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत पाम च्या आर्थिक उत्पन्नातुन 5 टक्के दिव्यांग निधी वाटप अर्थसहाय्य म्हणून सहा हजार रुपये चा धनादेश गावातील २५ दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार व साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सरपंच दर्शना पिंपळे , उपसरपंच मनोज पिंपळे, ग्रामसेवक अरविंद संखे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते निधिचे वाटप करण्यात आली.
Comments
Post a Comment