बोईसरमध्ये तरुणीवर घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बोईसरमध्ये तरुणीवर घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 


बोईसर : बोईसर शहरालगत सिध्दार्थ नगर येथे  एका २२ वर्षीय तरुणीवर घरात घुसून तरुणाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली असून या प्रकरणी बोईसर पोलिसांनी सूरज फडतरे या तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असून महिलांवर होणाऱ्या अत्याचारात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यात पुन्हा एकदा बोईसर पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.


बोईसर मधिल सिद्धार्थ नगर निरंकारी भवन परिसरामध्ये एका युवतीवर शेजारी राहणाऱ्या सुरज फडतरे या तरुणांनी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत  जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


सदर पीडित तरुणी ही बोईसर येथील सिद्धार्थ नगर निरंकारी भवनच्या जवळ आई, वडील, लहान बहीण व लहान भाउ असे एकत्र राहत असुन वडील वेल्डर चे काम करतात त्यावर परिवाराचा उदरनिर्वाह चालत असे आई ची तब्येत बरी नसल्यामुळें आई व लहान भाउ एक महिन्यापासून गावाला गेले होतें त्यामुळे पीडित मुलगी तिची लहान बहीण व वडील तिघेच राहत होते  दि.१५ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे दिवसभराची कामे आटपुन सध्याकाळी 6 वाजता  पीड़ित तरुणी रहमत नगर च्या नाक्या वर जाऊन पैनकार्ड बनविण्यासाठी पैसे देऊन घरी आली त्यानंतर 8.15 वाजताच्या सुमारास घराच्या दरवाज्या बाहेरून आवाज आला की घरात कोणी आहे का तेव्हा पीड़ित तरुणीने घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या शेजारी राहणारा सूरज फडतरे हा उभा होता तेव्हा त्याने विचारले की घरात कोण कोण आहे पीड़ित तरुणीने एकटीच आहे असे बोलताच सूरज फडतरे याने पीड़ितेच्या घरात घुसून दरवाजा बंद करून सूरज ने  तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तसेच आरडा ओरडा करू नये म्हणून तोंड दाबुन ठेवले आणि तू जर कोणाला काही सांगितले तर त्यात तुझीच बदनामी होईल तसेच तुला व तुझ्या वडिलांना बघून घेईल अशी धमकी देऊन निघून गेला त्यानंतर पीड़ित तरुणी ने घडलेला प्रकार शेजारी राहणाऱ्या काकु ला सांगितले त्यानंतर घडलेल्या प्रकारा बाबत पिडीतेने बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सूरज विरोधात गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी