पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी घेतली लाच आणि एसीबीने त्यांना पकडले रंगेहाथ

पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी घेतली लाच आणि एसीबीने त्यांना पकडले रंगेहाथ

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यावर मुंबई लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना आदिवासी जमीन प्रकरणात ५० हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यात झालेली असताना त्यांनी पदभार सोडलेला नव्हता पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून याठिकाणी विविध प्रकल्पाकरता मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण सुरू असून भूसंपादन होत असताना आदिवासींच्या जमिनी तसेच सरकारी जमीनी धनाढ्यांच्या घशात घालण्यासाठी कागदपत्रांची रंगरंगोटी या कार्यालयात केली जात असल्यामुळे पालघर जिल्ह्यावर या अधिकाऱ्यांना मोहमायाचा प्रेम ऊतू आलेला आहे त्यामुळेच बदली झालेली असताना देखील त्याच ठिकाणी दिर्घकाळ थांबून राहणे आता चांगलाच महागात पडलेला आहे.

वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देखील मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच मागितली होती.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच ५० हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. तसेच जाधवर यांच्या घराची झाडाझडती सुरू असून मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही तर प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ मजलेली असून अजून किती मासे या जाळ्यात अडकणार हे तपासणी अंती कळेल.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी