स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी
स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी
पालघर : अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार असून या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांनी अर्ज भरावेत आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे असा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने ठराव झाला होता.
त्या अनुषंगाने आज दिनांक आज दिनांक 14 जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या दालनात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद मध्ये भरण्यात येणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात केवळ स्थानिक उमेदवारांनी अर्ज भरावेत पालघर जिल्हा बाहेरील पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज देखील करू नये असे एकमताने आवाहन करण्यात आले. यावेळी मा.सभापती मनीषाताई निमकर आणि सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. जर बाहेरील पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज केल्यास सर्व जिल्हा परिषद सदस्य व सर्व स्थानिक पक्षीय संघटना त्यास विरोध करतील ही ठाम भूमिका या बैठकीच्या वेळी घेण्यात आली त्याचबरोबर जिल्हा बाहेरील पात्र उमेदवारांनी हा अर्ज भरू नये. तसेच स्थानिक उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या कालावधीत जिल्हा बाहेरील उमेदवार अर्ज दाखल करतात का याकडे लक्ष देऊन रहावे, असे आवाहन देखील या बैठकी दरम्यान सर्व सदस्यांनी केले.
सर्वसाधारण सभेच्या ठरावानंतर जिल्ह्यातील ओबीसी आदिवासी सर्व एकवटल्या असून सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तसेच स्थानिक आदिवासी संघर्ष समितीची देखील ही मागणी असल्याचे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले.
Comments
Post a Comment