तारापूर पोलीस ठाणे हद्दीत नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
तारापूर पोलीस ठाणे हद्दीत नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
तारापूर : राज्यात विरोधी पक्षांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मूक आंदोलन सुरू असताना एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी महिला आणि मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
पालघर जिल्ह्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीत कुडन या गावात १४ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असुन तारापूर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, जव्हार येथुन कामानिमित्त कुडन ग्रामपंचायत हद्दीतील नवीन चिंचपाडा येथे राहत असलेला आरोपी रामा बोये याने आईवडिलांसोबत रहात असलेल्या १४ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची तक्रार शनिवारी दि.24 रोजी तारापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. आरोपी रामा बोये याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४/१ व पॉस्को कायदा अंतर्गत कलम ४,८,१२ प्रमाणे तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला काल न्यायालयासमोर हजर केले असता २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास तारापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निवास कणसे करत आहेत.
Comments
Post a Comment