तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वेलियंट ग्लास वर्क प्रा.लि कारखान्यात एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू ....
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वेलियंट ग्लास वर्क प्रा.लि कारखान्यात एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू ....
बोईसर : दि.६ ऑगस्ट रोजी तारापुर औद्योगिक क्षेत्रातील जे -८५ वेलियंट ग्लास वर्क प्रा लि या कारखान्यात गुलाब जयस्वाल या कंत्राटी कामगाराला मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील जे -८५ वेलियंट ग्लास वर्क प्रा. लि या कारखान्यात दि.६ ऑगस्ट मंगळवारी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान गुलाब जयस्वाल या कंत्राटी कामगाराला
जीव गमवायची वेळ आलेली आहे. ३२ वर्षीय गुलाब जयस्वाल बोईसर येथील धनानी नगर येथे राहत असून पप्पू पुनिया या ठेकेदाराच्या ठेक्यात तो हेल्पर म्हणून कार्यरत होता. यात पप्पू पुनिया यांनी आपला नाव कुठे येऊ नये म्हणून अतुल सिंह नामक एका व्यक्तीला उभा करून कामगाराच्या मृत्यू बाबत पत्रकारांना माहिती देत असल्याचे निदर्शनास येताच मृत्यूचे खरे कारण उघडकीस येऊ नये म्हणून माहिती देणाऱ्या कामगाराला धमकावत बाजूला खेचत नेण्याचे काम या फंटर कडून करण्यात आल्याचे टिमा रूग्णालयाच्या प्रवेश द्वाराजवळ दिसून आले. गुलाब जयस्वाल या कामगाराचा घसरून गटारीत पडून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करत मृत्यूचे खरे कारण लपवत असल्याचे याठिकाणी दिसून येत असून बोईसर पोलिसांकडून चौकशी सुरू असून तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आलेला असून या अहवालानंतर सत्यता समोर येईल असे कामगार वर्गातून बोललं जात आहे.
यातच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दिवसागणिक अपघातात वाढ होऊ लागलेली असून कारखाना प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने विचार केला जात नसला तरी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून देखील ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली आहे का ? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment