पोमण ग्रामपंचायती मधील बेकायदा बांधकामा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर तिरडी आंदोलन
पोमण ग्रामपंचायती मधील बेकायदा बांधकामा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर तिरडी आंदोलन
पालघर: वसई तालुक्यातील पोमण या ग्रामपंचायती अंतर्गत अनेक अनधिकृत बांधकामे झालेले आहेत. या विरोधात तक्रार दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ अर्जदार नानासाहेब कोळेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी आंदोलन करण्यात आले.
पोमण या ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. या बांधकामामुळे दोन मजुरांचा जीव देखील गेला होता. ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय येथे वारंवार अनधिकृत बांधकामे तोडण्यासंदर्भात मागणी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.परिणामी या प्रकाराच्या निषेधार्थ आंदोलन करत असल्याचे कोळेकर यांनी म्हटले आहे. वसईचे तहसीलदार यांनी विकासकांसोबत आर्थिक व्यवहार साधत अनधिकृत बांधकामांना अभय दिल्याचे आरोप कोळेकर यांनी केले आहेत. मागणीची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी आंदोलन कोळेकर यांच्यामार्फत सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे कोळेकर यांनी म्हटले.मात्र ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचेही कोळेकर यांनी म्हटले.
Comments
Post a Comment