रणकोळ आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा, कासा रुग्णालयात उपचार सुरू
रणकोळ आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा, कासा रुग्णालयात उपचार सुरू
पालघर : पालघरमधील एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ विद्यार्थिनींना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रम शाळेतील २७ विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या २७ विद्यार्थिनींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने या विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जेवणातून आणि पाण्यातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment