बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पालघर येथे शिवसेना उबाठा गटाकडून तीव्र निषेध आंदोलन

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पालघर येथे शिवसेना उबाठा गटाकडून तीव्र निषेध आंदोलन


पालघर : 'नको आम्हला लाडकी बहीण, आम्हाला हवी सुरक्षित बहीण' च्या घोषणेने पालघर शहरातील हुतात्मा चौक दुमदुमून गेला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पालघर येथे शिवसेना उबाठा गटाकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या, अशी घोषणा ही करण्यात आली, यावेळी शिवसेना उबाठा गटाचे महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अजय ठाकूर पत्रकारांशी बोलता म्हणाले की बदलापूर मध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला, तसेच पुण्यामध्ये, नाला सोपारा मध्ये व अश्या अनेक ठिकाणीं महिलांवर अत्याचार सुरू आहे. परंतु हे सरकार दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई करत आहे. बदलापूर घटनेला बारा तास पेक्षा जास्त काळ उलटून ही हे सरकार कारवाई करण्यात दिरंगाई करत आहे. महाराष्ट्रात अश्या अत्याचार वारंवार महिलांवर होत आहे, राज्यात महिला सुरक्षित नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारने लाडकी बहीण योजने ऐवजी सुरक्षित महिला योजना राबवली पाहिजे.  


जिल्हा प्रमुख अजय ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात अनुप पाटील, भूषण संखे, कैलास म्हात्रे, गिरीश राऊत, दिनेश तारवी, जितेंद्र पामाळे, हेमंत संखे, भारती कामडी व राधा पामाळे यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी