नंडोरे देवखोप ग्रृप ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानांकन
नंडोरे देवखोप ग्रृप ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानांकन
आज दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जि प पालघर येथील बिरसामुंडा सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नंडोरे देवखोप ग्रृप ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनल घाटके, माजी उपसरपंच रोहन वेडगा, ग्रामविकास अधिकारी निलेश देवरे, ग्रा पं सदस्य सुचिता पाटील, मानसी तरे यांचा सत्कार करून ग्रृप ग्रामपंचायत नंडोरे- देवखोप यांना आयएसओ ९००१:२०१५ नामांकन दर्जा प्राप्त प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी जि प अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित, पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वनगा, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जि प उपाध्यक्ष पंकज कोरे, सभापती रोहिणी शेलार, सभापती संदीप पावडे, सभापती मनीषा निमकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, विस्तार अधिकारी माळी, पुरस्कार प्राप्त गुणवंतांचे कुटुंबीय, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग, पत्रकार, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
Comments
Post a Comment