बोईसर ग्रामपंचायत हद्दित पालघर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुकुंद शर्मा ने केले अनधिकृत बांधकाम
बोईसर ग्रामपंचायत हद्दित पालघर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुकुंद शर्मा ने केले अनधिकृत बांधकाम
पालघर ! बोईसर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नंबर ३१ /१ व सर्वे नंबर ३१/२ परमाणु नगर येथील भूखंड क्रमांक ६ ते १४ असे एकूण क्षेत्रफळ ५२७१ चौरस मीटर क्षेत्राचे भूखंड न्यूक्लिअर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांनी मा. अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडील आदेश क्रमांक एन एपी/एस आर /३९/९७ दिनांक २५ /०२ /१९९७ रोजीच्या आदेशान्वये रहिवाशी प्रयोजनार्थ बिनशेती केलेला असल्याचे नमूद केले आहे .
प्रत्यक्षात जागेवर हे बांधकाम तळमजला अधिक एक मजला यापेक्षा जास्त बांधकाम असू नये अशी अट या आदेशात देण्यात आली आहे. असे असताना प्लॉट नंबर ६ए/ मुकुंद व्हि .शर्मा यांचा आहे . या मध्ये त्याने नियमाचे उल्लंघन करून अनधिकृत पणे बांधकाम सुरू केले आहे. या अनधिकृत बांधकामा संदर्भात पालघर दिवाणी न्यायालयात ही केस सुरू असताना ह्या केसच्या सर्व बाजू पाहून न्यायाधीशांनी मुकुंल शर्मा ह्याला दि.२५/०६/२०२४ रोजी दिवाणी न्यायालयातून आदेश पारित करण्यात आला की , दुसऱ्या मजल्यावरच्या बांधकामा मध्ये कोणत्याही प्रकारे फेर बदल करू नये ." जैसे थे "असा आदेश झाला असताना ही, बंगल्याचे काम जोमात सुरू ठेवून मुकुंद शर्मा ने पालघर दिवाणी न्यायालय पालघर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखुन अवमान केला आहे .
सदर व्यक्तीवर कोर्ट ऑफ कंडेंचा गुन्हा दाखल करून ,सुरू असलेले अनधिकृत बांधकाम त्वरित बंद करण्याचे आदेश जारी करण्यात यावे .अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत. आता पालघर दिवाणी न्यायालय या विषयावर कोणती भूमिका बजावतात याकडे सर्वांची नजर लागली आहे.
Comments
Post a Comment