उत्तम केमिकल कारखान्यात सूरक्षे अभावी कामगाराला गमाववा लागला जीव

उत्तम केमिकल कारखान्यात सूरक्षे अभावी कामगाराला गमवावा लागला जीव


बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दिवसागणिक अपघातात वाढ होऊ लागलेली असून उत्तम केमिकल कंपनीत सुरक्षे अभावी एका ३२ वर्षीय कामगाराला जीव गमवावा लागला.

पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात  उत्तम केमिकल भूखंड क्रमांक टी-८७ ह्या कारखान्यात पत्रे टाकण्याचे काम करणाऱ्या गोरेलाल सिंग या कामगाराचा सूरक्षे अभावी अचानक खाली पडून मृत्यू झाला . ४ऑगस्ट आणि ५ ऑगस्ट दरम्यान या  ठेकेदार महेश राणे यांच्यामार्फत उत्तम केमिकल कंपनीत पत्रे चढवण्याचे काम सुरू असताना अचानक ३२ वर्षीय गोरेलाल सिंग खाली पडून गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ च्या सुमारास  कामगाराचा मृत्यू झाला.


 मृत कामगार गोरेलाला सिंग ह्याच्या कुटुंबात पत्नी व २ वर्षांची मुलगी असा परिवार आहे, कामगाराच्या मृत्यूची बातमी समजताच निलेश राणे कॉन्ट्रॅक्टर कामगाराचा मृतदेह रुग्णालयात सोडून पळून गेला, पीडित कुटुंबाच्या जबाबदारी स्वीकारण्यास कारखानदार नकार देत असून कुटुंबीयांनी पालघर जिल्हा प्रशासन औद्योगिक संचालनालय (डीश)आणि बोईसर पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी